breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
आमदार लक्ष्मण जगताप यांच्या विकास निधीतून चार प्रभागासाठी पाण्याच्या टँकरचे लोकार्पण
![Dedication of water tankers for four wards from the development fund of MLA Laxman Jagtap](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/laxman-jagatap-pcmc-1.jpg)
पिंपरी । प्रतिनिधी
आमदार लक्ष्मण जगताप यांच्या स्थानिक विकास निधीतून ब, ड, ग आणि ह या चार प्रभागातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी चार पाण्याच्या टँकरचे वितरण करण्यात आले.
हा सोहळा शनिवार दिनांक १४ ऑगस्ट रोजी ओमेगा पॅरेडाइज् सोसायटी वाकड येथे संपन्न झाला. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयास ९ हजार लिटर क्षमतेचा पाण्याचा टॅंकरचे वितरण आमदार लक्ष्मण जगताप व महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. यावेळी क्षेत्रीय प्रभाग अधिकारी अधिकारी, प्रभाग अध्यक्ष यांच्या उपस्थितीत होते. या कार्यक्रमाचे संयोजन माजी नगरसेवक विनायक गायकवाड, युवानेते राम वाकडकर, विशाल आप्पा कलाटे यांनी केले होते.