breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कोरोनामुळे प्राण गमावलेल्या व्यक्तींचे मृत्यू दाखले पालिकेने घरपोच द्यावेत – महापौर

पिंपरी / महाईन्यूज

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना विषाणू संसर्गाच्या दुस-या लाटेचा प्रादुर्भाव असून रुग्णसंख्या कमी करण्याबाबत महापालिकेकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. रुग्ण किंवा नागरिक यांचा मृत्यु झाल्यास मयताचे नातेवाईकांस मृत्यू दाखला मिळविण्यासाठी सतत रुग्णालयात जावे लागत आहे. त्यामुळे निरोगी व्यक्तींना कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका उद्भवू शकतो. मयताचे मृत्यु दाखले संबंधित नातेवाईकांकडे कोरोनाविषयक शासकीय नियमांचे पालन करुन घरपोच उपलब्ध करुन देणेबाबतची कार्यवाही करावी, अशा सूचना महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी आयुक्त राजेश पाटील यांना दिल्या आहेत.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button