breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

Cyclothon : पिंपरी-चिंचवडमध्ये सायकलस्वारांनी दिला सुरक्षिततेचा संदेश

पिंपरी |महाईन्यूज|

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड यांच्यातर्फे गुरुवारी सायक्‍लोथॉन आणि वॉकेथॉन आयोजित केले होते. यावेळी पादचारी आणि सायकलस्वारांच्या सुरक्षिततेचा संदेश देत नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

चिंचवड येथील ऑटो क्‍लस्टर येथे महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते सकाळी सात वाजता उद्‌घाटन झाले. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर उपस्थित होते. उद्‌घाटन झाल्यानंतर काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी बीआरटी रस्त्याने सायकलिंग सुरू झाले. औंध-रावेत बीआरटी मार्गावरील काळेवाडी फाटा येथे जाऊन परत ऑटो क्‍लस्टरपर्यंत परत आले.

सायक्‍लोथॉन आणि वॉकेथॉन उपक्रमाची माहिती देताना महापालिका आयुक्‍त हर्डीकर म्हणाले, की पिंपरी-चिंचवड शहराने केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयाच्या ‘इंडिया सायकल्स फॉर चेंज’ या उपक्रमामध्ये सहभाग घेतला आहे. पायी चालणाऱ्या अर्थात पादचारी व्यक्ती आणि सायकलस्वारांना सुरक्षित व सोईस्कर सुविधा पुरविणे, हा या उपक्रमाचा भाग आहे. त्याची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीचे औचित्य साधून पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड यांच्या वतीने झाली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button