ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये गुन्हेगारांना लगाम; ३ महिन्यांत ७६ सराईत गुन्हेगार हद्दपार

पिंपरी-चिंचवड | शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलत जानेवारी ते मार्च २०२६ या कालावधीत परिमंडळ १, २, ३, ४ अंतर्गत तब्बल ७६ सराईत गुन्हेगारांना हद्दपार केले आहे. या कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तींना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर आयुक्त तसेच अपर आयुक्त (प्रादेशिक) यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. त्यांच्या आदेशानुसार पोलीस ठाण्यांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांवर ठोस प्रतिबंधक उपाययोजना राबविण्यात आल्या.

हेही वाचा     :            कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा जागीच मृत्यू

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ५५, ५६ व ५७ अन्वये या आरोपींना पुणे जिल्हा तसेच रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुका हद्दीतून हद्दपार करण्यात आले आहे. हद्दपार करण्यात आलेले आरोपी विविध वयोगटातील असून त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.

याशिवाय, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय परीक्षेत्राअंतर्गत शेकडो संशयित व सराईत गुन्हेगारांच्या हालचालींवर पोलिसांचे बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोठी मदत होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button