पिंपरी / चिंचवड

फायनान्स ऑफिसची तोडफोड करत दरोडा टाकल्याबाबत आठ जणांवर गुन्हा : एकास अटक

पिंपरी l प्रतिनिधी

रिव्हर रोड, पिंपरी येथे असलेल्या पीएस फायनान्स या ऑफिसवर कोयते, लाकडी दांडके, दगड मारून तोडफोड केली. तोडफोड केल्याचा जाब विचारल्याने फायनान्स कंपनीच्या मालकाला कोयत्याचा धाक दाखवून आठ जणांनी लुटले. ही घटना रविवारी (दि. 13) सायंकाळी साडेपाच ते सहा वाजताच्या सुमारास घडली.

मुन्या उर्फ महेश चंदनशिवे, बाळ्या ओगले, काळ्या उर्फ प्रकाश मगर, शुभम घरवाडवे, संजय गजानन मुरगुडे (वय 21, रा. चिखली) आणि अन्य दोन ते तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी प्रमोद दत्तात्रय साबळे (वय 31, रा. पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पीएस फायनान्स ही कंपनी असून त्याचे ऑफिस रिव्हर रोड पिंपरी येथे आहे. रविवारी सायंकाळी आरोपींनी फिर्यादी यांच्या ऑफिसवर कोयते, दांडके आणि दगड मारून तोडफोड केली. याबाबत फिर्यादी यांनी आरोपींना विचारणा केली असता आरोपी मुन्या याने ‘तू लोकांना व्याजाने पैसे देतो. चांगले पैसे कमावतो. तुला जर इथे धंदा करायचा असेल तर आम्हाला पैसे द्यावे लागतील’ अशी धमकी दिली.

तर अन्य आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ करून त्यांच्या खिशातील 1100 रुपये जबरदस्तीने कोयत्याचा धाक दाखवून काढून घेतले. पोलिसात तक्रार केली तर बघ अशी धमकी देखील दिली. त्यानंतर आरोपींनी कोयते, दांडके हवेत फिरवत रस्त्यावरील हातगाड्यांवर मारून निघून गेले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button