महावीर चौकात रास्ता रोको करणा-या 30 आंदोलकांवर गुन्हा दाखल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/01/crime-police-FIR.jpg)
पिंपरी l प्रतिनिधी
चिंचवड स्टेशन येथील महावीर चौकात रास्ता रोको करणा-या लहूजी शक्ती सेनेच्या 30 आंदोलकांवर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. हे आंदोलन बुधवारी (दि. 18) दुपारी दोन वाजताच्या सुमारास झाले.
याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक नंदकिशोर गजानन पतंगे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुरज दशरथ कांबळे (वय 25, रा.वाकड) यांच्यासह इतर 29 आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी बुधवारी दुपारी महावीर चौक चिंचवड येथे आंदोलन केले. तसेच हातात पिवळे झेंडे घेऊन प्रशासनाचा धिक्कार असो, राडा घातल्याशिवाय जाग येणार नाही अशी आंदोलकांनी घोषणाबाजी करत रहदारीस अडथळा निर्माण केला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन न करता कर्तव्यात अडथळा केला. तसेच पोलिसांनी सीआरपीसी 149 प्रमाणे दिलेल्या नोटीस मधील आदेशाचाही भंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.