#COVID19: कोरोनाविरुद्धच्या लढाईत आमदार सुनील शेळके यांचे ‘आम्ही मावळकर’अभियान; कोरोनाला हद्दपार करणार!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/17-1.jpg)
मावळ। महाईन्यूज । प्रतिनिधी
कोरोनाचा प्रादुर्भावर रोखण्यासाठी सरकार आणि प्रशासनाचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांच्या सहभागाशिवाय कोरोनाच्या राक्षसाला आपण हरवू शकत नाही. त्यामुळे मावळ विधानसभा मतदार संघाचे आमदार सुनील शेळके यांनी ‘आम्ही मावळकर’असे सोशल कॅम्पेनिंग सुरू केले आहे. त्याद्वारे नागरिकांमध्ये सोशल डिस्टंसिंग आणि कोरोनाबाबात जनजागृती करण्यात येत आहे.
आम्ही मावळकर…प्रशासनाला सहकार्य करणार; कोरोनाला हद्दपार करणार!
आमदार सुनील शेळके यांनी सोशल डिस्टंसिंगबाबात सुरू केलेल्या उपक्रमाची चर्चा महाराष्ट्रभरात झाली. भाजीविक्रेता अथवा जीवनाश्यक वस्तुंच्या दुकानांसमोर होणारी नागरिकांनी गर्दी लक्षात घेवून रकामे आखून सोशल डिस्टंसिंगची काळजी घेण्याच्या ‘तळेगाव पॅटर्नचे अनुकरण राज्यातील विविध शहरांत करण्यात आले. आता कोरोनाबाबत जनजागृती आणि नागरिकांना या लढाईत सकारात्मक दृष्टीने सहभागी करुन घेण्यासाठी आमदार सुनील शेळके यांनी ‘आम्ही मावळकर…प्रशासनाला सहकार्य करणार; कोरोनाला हद्दपार करणार’अशी थीम घेवून सोशल मीडियावर कॅम्पेनिंग सुरू केले आहे. त्याद्वारे नागरिकांनी प्रशासनाला सर्वोतोपरी सहकार्य करावे, अशी अपेक्षा आहे.