breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

COVID 19 : वायसीएम रुग्णालयातील एका डॉक्टरचे रिपोर्ट पॉझिटीव्ह

पिंपरी| महाईन्यूज | प्रतिनिधी

कोरोनाविरोधात लढणा-या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील डॉक्टरचे आज शनिवारी (दि. २३) रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहे. त्यामुळे डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात हे डॉक्टर कार्यरत आहेत. त्यांचे वय 30 आहे. कोरोना बाधित रुग्णांवर ते उपचार करत होते. त्यांच्या घशातील द्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्याचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

त्यांच्यावर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोनाची लढाई लढणा-या डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, यापुर्वीही एका खासगी डॉक्टरला कोरोनाची लागण झाली होती. त्या डॉक्टरने कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button