Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
#CoronaVirus: पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवस भरात ६ कोरोना बाधित
पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवस भरात ६ जण करोना बाधित आढळले असून यात ३ वर्षीय चिमुकल्याचा समावेश आहे. शहरातील करोनाबाधितांची एकूण संख्या १७४ वर पोहचली असून १११ जण करोनामुक्त झालेले आहेत. या पैकी दोघांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. ते पिंपळे निलख आणि दिघी परिसरातील रहिवासी आहेत. तर पॉझिटिव्ह आलेले रुग्ण हे चऱ्होली येथील असून त्यांच्यावर महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.