breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

#CoronaVirus : पिंपरी-चिंचवड महापालिकेने महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाचे सर्व कार्यक्रम केले रद्द

पिंपरी | महाईन्यूज| प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शासन निर्णयानुसार दरवर्षी १ मे रोजी महाराष्ट्र राज्य स्थापनेचा वर्धापन दिन साजरा करणेत येतो. महापालिकेच्या प्रांगणात महापौर यांच्या हस्ते तसेच आठ क्षेत्रीय कार्यालयात प्रभाग अध्यक्ष क्षेत्रीय अधिकारी यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात येते. मात्र, कोरोनाच्या भितीपोटी यंदा हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

तथापि, यावर्षी कोरोना विषाणूचा संसर्ग व धोका टाळण्यासाठी यंदाचा महाराष्ट्र दिन अत्यंत साधेपणाने साजरा करणेबाबत निवासी उपजिल्हाधिकारी, पुणे यांनी पत्र क्र . सी ई आर – २०२० प्र . क्र . ६५ / ३० दि . १५ / ०४ / २०२० अन्वये कळविलेले आहे. उपरोक्त पत्रानुसार फक्त पुणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयातच सदर कार्यक्रम करण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे.

१ मे २०२० रोजी महाराष्ट्र दिनाचे दिवशी महापालिका मुख्यालय, प्रभागामध्ये अथवा महापालिकेच्या कोणत्याही कार्यालयात ध्वजारोहणच्या कार्यक्रम घेऊ नये, असे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार पिंपरी चिंचवड महापालिका मुख्यालय समोर यावर्षी ध्वजारोहण करण्यात येणार नाही, असे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांनी सर्व क्षेत्रीय अधिकारी वर्गाला कळविले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button