breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

#Coronavirus : पिंपरी-चिंचवडमध्ये आणखी एक करोनाचा रुग्ण

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरात आणखी एका करोनाबाधीत रुग्णाची ओळख पटली आहे. अमेरिकेतून तो दुबईमार्गे मुंबईत आला असून मुंबईतून तो पुण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पत्रकार परिषदेत आज मंगळवारी (दि. 17) सांगितली.

परदेशातून प्रवास करणारे 1048 प्रवासी काल रात्री पुणे विमानतळावर उतरले. त्यातील एकालाही करोनाचे लक्षण आढळले नाही. त्यामुळे त्या सर्वांना होम क्वारंटाईनच्या सूचना देऊन घरी सोडण्यात आले. अशातच मुंबईतून पिंपरी-चिंचवडमध्ये आलेल्या एकाला करोनाचा संसर्ग झाल्याचे आज निष्पन्न झाले. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हा व्यक्ती अमेरिकेतून दुबईमार्गे मुंबईत आलेला आहे. मुंबईतून तो पुण्यात आला आहे. त्यामुळे करोना बाधीत रुग्णांमध्ये आज आणखी एका रुग्णाची भर पडली आहे. पुण्यात एकूण करोना बाधितांची संख्या आता 17 झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button