#coronago : पालिकेच्या रुग्णालयात केवळ 3 हजार 466 कोरोनाबाधीत, प्रशासनाच्या हाताला यश
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/pcmc-Corona-virus.jpg)
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरामध्ये कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला यश येऊ लागले आहे. आजअखेर महापालिकेच्या रुग्णालयात केवळ 3 हजार 466 कोरोनाबाधीत रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांनी आता घाबरण्याचे मुळीच कारण नाही. स्वतः घरी काळजी घेणे गरजेचे आहे, असे पालिका प्रशासनाकडून आवाहन केले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत आजपर्यंत एकूण 79 हजार 966 कोरोनाबाधीत रुग्ण सापडले. त्यातील 1 हजार 348 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर, 72 हजार 980 रुग्ण ठणठणीत झाले. बरे झालेल्या रुग्णांमध्ये 5 हजार 175 रुग्ण हे शहराबाहेरील आहेत. आता पालिकेच्या रुग्णालयात केवळ 3 हजार 466 एवढेच रुग्ण कोरोना विषाणुचा सामना करत आहेत. त्यांच्यावर पालिका वैद्यकीय विभागातील डॉक्टर योग्य उपचार करत आहेत. त्यामुळे त्यांच्याबाबत काही काळजी करण्याचे कारण नाही.
शहरातील नागरिक स्वतः घरामध्ये काळजी घेत आहेत. वाफ घेणे, गरम पाणी पिणे, बाहेरचे खाणे टाळणे, सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे, मास्क वापरणे यामुळे शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा आता कमी होत आहे. त्याचा परिणाम पिंपरी-चिंचवडकर कोरोनाला परतवून लावण्यात यशस्वी होत आहेत.