Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
#Corona fight : मगर स्टेडियममध्ये महापालिकेचे भाजीपाला विक्री केंद्र सुरू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/IMG-20200416-WA0013.jpg)
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने अण्णासाहेब मगर स्टेडियममध्ये भाजीपाला विक्री केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राची महापौर माई उर्फ उषा ढोरे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांच्याकडून पाहणी करण्यात आली.
या ठिकाणी सामाजिक अंतर (सोशल डिस्टंसिंग) ठेवून भाजीपाला विक्रेत्यांना चौकटी आखून देण्यात आल्या आहेत. तसेच, भाजीपाला विक्री केंद्राच्या प्रवेशद्वाराजवळ भाजीपाला खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांची टेम्प्रेचर गणच्या साहाय्याने तपासणी केली जात आहे. सॅनिटायझर टनेलच्या साहाय्याने निर्जंतुकीकरण करून नागरिकांना आतामध्ये सोडले जात असून नागरिकांकडून प्रतिसाद मिळत आहे.