breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
टेल्को रस्त्यावरील कंटेनर पार्किंगमुळे नागरिकांना त्रास
![Container parking on Telco Road causes inconvenience to citizens](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/17c6e5c8-77e8-4da4-bb69-300df4ee9e0e.jpg)
- स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव यांची कारवाईची मागणी
पिंपरी । प्रतिनिधी
जुनी आरटीओ समोर येथील टेल्को रस्त्यावर कंटेनरचे बेकायदा पार्किंग केले जाते. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे बेकायदा पार्किंक करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करावी, अशी मागणी स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव यांनी केली आहे.
टेल्को रस्त्यावर रस्त्याच्या बाजूला अवजड कंटेनर उभे केले जातात. बीआरटी मार्ग असलेल्या रस्त्यावर बेकायदा पार्किंग केल्यामुळे पीएमपीएमएलची बसही या रस्त्यावरून जात नाही. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे याबाबत वाहतूक विभागाने तातडीने कारवाई करुन वाहतूक सक्षम करावी, अशी मागणी दिनेश यादव यांनी केली आहे.