पिंपरी / चिंचवड

बेंगलोर-मुंबई महामार्गावर कंटेनर-कारचा अपघात : महिलेचा मृत्यू, तिघेजण जखमी

पिंपरी l प्रतिनिधी

बेंगलोर-मुंबई महामार्गावर पुनावळे येथे रस्त्यात अचानक थांबलेल्या कंटेनरला एका कारची मागून धडक बसली. यामध्ये कारमधील महिलेचा मृत्यू झाला. तर तिघेजण जखमी झाले आहेत. हा अपघात सोमवारी (दि. 28) पहाटे चार वाजता पुनावळे येथे झाला.

प्रज्ञा कैलास उपरे असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी कैलास तुळशीराम उपरे (वय 35, रा. तळेगाव दाभाडे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कैलास आणि त्यांची दोन मुले जखमी झाली आहेत. पोलिसांनी अज्ञात कंटेनर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कैलास उपरे, त्यांच्या पत्नी प्रज्ञा आणि दोन मुले असे चौघेजण त्यांच्या कारमधून बेंगलोर-मुंबई महामार्गावरून जात होते. पुनावळे येथे लकी हॉटेल समोर एक कंटेनर अचानक रस्त्यात थांबला. त्यामुळे कैलास यांच्या कारची कंटेनरला पाठीमागून धडक बसली. यामध्ये कैलास आणि त्यांची दोन मुले जखमी झाली तर कैलास यांच्या पत्नी प्रज्ञा यांचा मृत्यू झाला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button