ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सेक्टर 12 प्रधानमंत्री आवास गृहप्रकल्पातील क्लब हाऊस, मैला शुद्धीकरण प्रकल्पाचा प्रश्न मार्गी!

महानगर आयुक्त योगेश म्हसे यांचे आश्वासन

सोसायटी फेडरेशनचा यशस्वी पाठपुरावा

पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) सेक्टर 12 मधील पी.एम.ए.वाय.(प्रधान मंत्री आवास योजना) गृहप्रकल्पातील 5000 सदस्यांचे क्लब हाऊस आणि मैला शुद्धीकरण प्रकल्प याबाबत वर्षांभर चाललेल्या अडचणी अखेर मार्गी लागल्या आहेत.

प्राधिकरणाने चुकीच्या पद्धतीने क्लब हाऊस महानगरपालिकेकडे हस्तांतरित केल्याने सोसायटीधारकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला होता. तसेच, 45 सहकारी गृहरचना संस्थांसाठी बसवण्यात आलेल्या सिंपल ट्रीटमेंट प्लांट (STP) ला सोसायटीकडून हस्तांतर न मिळाल्यामुळे प्रकल्प बंद होता. त्यामुळे पाणी टंचाईसह परिसरात दुर्गंधी पसरली होती. या समस्यांवर उपाय करण्यासाठी चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशन मार्फत आज महानगर आयुक्त योगेश म्हसे यांच्याशी बैठकीत चर्चा झाली.

हेही वाचा         :              प्रतिभा ज्युनिअर कॉलेजमध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात

आयुक्तांनी बैठकीत स्पष्ट केले की, क्लब हाऊसचे चुकीच्या पद्धतीने केलेले हस्तांतरण मागे घेतले जाईल आणि ते संबंधित गृहप्रकल्पात परत हस्तांतरित केले जाईल. तसेच, बंद असलेला मैला शुद्धीकरण प्रकल्प त्वरित चालू करण्याचे आदेश दिले गेले. पुढील आठ ते दहा दिवसांत याबाबत परत बैठक घेऊन सोसायटीकडून प्रकल्प हस्तांतरित होईल असेही आश्वासन मिळाले. सोसायटीधारकांनी ही घोषणा ऐकून दिलासा घेतला आणि परिसरात आनंदाचे वातावरण आहे. याशिवाय, सेक्टर 12 मधील दुसऱ्या रस्त्यावरील धूळ आणि राडाराडा दूर करून रस्ता लवकर चालू करण्याचेही आदेश आयुक्तांनी दिले.

सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी सांगितले, “सदर प्रकल्पांमध्ये झालेल्या चुकीच्या निर्णयामुळे सोसायटीधारकांना वेठीस धरले गेले होते. आजच्या बैठकीनंतर प्रशासनाकडून योग्य निर्णय घेण्यात आले आणि आम्ही सदैव सोसायटीधारकांच्या हक्कासाठी उभे राहू.” हे पाऊल सोसायटीधारकांसाठी मोठा दिलासा असून, भविष्यातील समस्यांवर तत्परतेने तोडगा काढण्याची दिशा दाखवते.

“सेक्टर-१२ मधील प्रधानमंत्री आवास प्रकल्पामध्ये होणाऱ्या चुकीच्या निर्णयांमुळे आमचे सोसायटीधारक अनेक वर्षे वेठीस होते. क्लब हाऊस, मैला शुद्धीकरण प्रकल्प आणि पाणी व्यवस्थापनासंबंधी समस्या यामुळे जीवनमानावर प्रतिकूल परिणाम होत होता. आजच्या बैठकीत आयुक्त श्री. योगेश म्हसे यांनी दिलेल्या स्पष्ट आश्वासनामुळे सोसायटीधारकांना न्याय मिळाला आहे. आम्ही, चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशन, सदैव सोसायटीधारकांच्या हक्कासाठी उभे राहतो आणि भविष्यातही कोणत्याही अन्यायाविरुद्ध प्रामाणिकपणे संघर्ष करणार आहोत.

– संजीवन सांगळे, अध्यक्ष, सोसायटी फेडरेशन.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button