तिरंगा सायकल रॅलीला शहरातील सायकलपटूंचा उदंड प्रतिसाद
उन्नती सोशल फाउंडेशनचा पुढाकार : स्वातंत्र्यदिनी ‘भारत माता की जय’चा जयघोष
![Unnati Social Foundation, Tricolor Rally, Cycle Rally, Responsive, Pimple Saudagar,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/08/Unnati-Fundation-780x470.jpg)
पिंपरी : स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने पिंपळे सौदागर येथील उन्नति सोशल फाउंडेशन यांच्या संयोजनातून आणि इंडो ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या सहकार्याने बुधवारी आयोजित केलेल्या तिरंगा सायकल रॅलीला शहरातील सायकलपटूंचा उदंड प्रतिसाद मिळाला. पिंपळे सौदागर येथील उन्नति सोशल फाउंडेशनच्या कार्यालयापासून या ‘भव्य तिरंगा सायकल रॅली’ला सुरुवात झाली.
याप्रसंगी भाजपाच्या चिंचवड विधानसभा आमदार अश्विनीताई लक्ष्मण जगताप, भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप, निवृत्त लष्कर अधिकारी डॉ. राजेंद्र मोरे, उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉ. कुंदाताई संजय भिसे, पी के इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक जगन्नाथ काटे, माजी नगरसेवक निर्मला कुटे, उद्योजक सोमनाथ काटे, वस्ताद भानुदास काटे, उद्योजक संजय भिसे, उद्योजक राजू भिसे, गणेश भुजबळ, प्रकाश झिंजुर्डे, आंतरराष्ट्रीय कबड्डी पंच दत्ता झिंजुर्डे, वाल्मिक कुटे, धनंजय भिसे, वाल्मिक काटे, अण्णा शेलार, विकास काटे, मनोज ब्राह्मणकर,कैलास कुंजीर,विशाल काटे, संभाजी काटे, श्रीरंग शेळके,राजेंद्रनाथ जयस्वाल, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विलास जोशी, संकेत कुटे, अतुल पाटील, सागर बिरारी, प्रदीप टाके, विवेक भिसे आदी मान्यवरांसह सुमारे १७०० सायकलपटु उपस्थित होते.
यावेळी भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. या रॅलीला उदंड प्रतिसाद लाभल्याचे चित्र पहावयास मिळाले. आठ वर्षाच्या बालकांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत आबालवृद्ध या तिरंगा सायकल रॅलीत मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. या रॅलीच्या माध्यमातून देशभक्तीचा जागर करण्यात आला. त्याचबरोबर पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
उन्नती सोशल फाउंडेशन च्या कार्यालयापासून निघालेली ही सायकल रॅली काळेवाडी फाटा, डांगे चौक’ ताथवडे’ बास्केट ब्रिज या मार्गाने काढण्यात आली.
मुक्ताई चौकातुन रहाटणी, पिंपळे सौदागर येथील उन्नती कार्यालय या ठिकाणी रॅलीची समाप्ती झाली. रिमझिम पावसातही या सायकल रॅलीला आबालवृद्धांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता. सर्व सहभागी सायकलस्वारांना टी शर्ट, सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
तिरंगा सायकल रॅलीला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. हजारो सायकलस्वार नागरिकांच्या सहभागामुळे व सहकार्याने ही रॅली यशस्वी झाली.
– डॉ. कुंदाताई भिसे – अध्यक्षा, उन्नत्ति सोशल फाउंडेशन.