लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना आजपासून महापालिकेत प्रवेश
![Citizens who have taken two doses of vaccine will be admitted to the Municipal Corporation from today](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/02/pjimage-2021-10-13T204833.528.jpg)
पिंपरी चिंचवड | पिंपरी-चिंचवड महापालिका मुख्यालयात आज (मंगळवार) पासून नागरिकांना पुन्हा प्रवेश मिळणार आहे. येणा-या सर्व नागरिक, अभ्यांगत यांनी कोरोना प्रतिबंध लसीकरणाच्या दोन्ही मात्रा पूर्ण केल्याची खात्री करुनच प्रवेश देण्यात यावा, याची सुरक्षा विभागाने दक्षता घ्यावी. याबाबतचा आदेश प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर यांनी काढला आहे.
शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होऊ झाली होती. 1 जानेवारीपासून प्रचंड मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत होते. विषाणूचा वेगाने फैलाव होता. वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी सर्व शासकीय, नियमशासकीय आणि महापालिका कार्यालयातील नागरिक, अभ्यांगतांच्या प्रवेशांवर निर्बंध आणण्यात आले होते. त्यामुळे 11 जानेवारीपासून नागरिकांना महापालिकेत प्रवेशबंदी केली होती.
आता रुग्णसंख्या कमी होत आहे. एक हजाराच्या आत रुग्णसंख्या आली आहे. त्यामुळे महापालिकेशी संबंधित कामकाजासाठी येणा-या सर्व नागरिक, अभ्यागंत यांना सुरक्षा विभागामार्फत प्रवेश देण्यात येईल. येणा-या सर्व नागरिक, अभ्यांगत यांनी कोरोना प्रतिबंध लसीकरणाच्या दोन्ही मात्रा पूर्ण केल्याची खात्री करुनच प्रवेश देण्यात यावा, याची सुरक्षा विभागाला खात्री करावी लागणार आहे.