शहरातील 18 वर्षांपुढील नागरिकांना शनिवारी मिळणार लस
![Municipality did not get Covishield vaccine! Only a dose of covacin will be available on Saturday](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/914328-corona-vaccine-2.jpg)
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील 18 वर्षांपुढील नागरिकांना 35 केंद्रांवर ‘कोविशिल्ड’चा पहिला तर 45 वर्षांपुढील नागरिकांना 28 केंद्रांवर ‘कोविशिल्ड’चा पहिला, दुसरा डोस उद्या (शनिवारी) देण्यात येणार आहे.कोविन अॅपवर 100 टक्के ऑनलाईन नोंदणी करुन स्लॉट बुकिंग केलेल्या लाभार्थ्यांचेच लसीकरण करण्यात येणार आहे. उद्या सकाळी 8 नंतर स्लॉट बुकिंगसाठी ओपन होणार आहेत. तर, 45 वर्षांपुढील नागरिकांना 4 केंद्रांवर ‘कोव्हॅक्सिन’चा दुसरा डोस देण्यात येणार आहे.
18 ते 44 वयोगटातील नागरिकांना ”कोविशिल्ड’ चा पहिला डोस या केंद्रांवर मिळणार!
कै. हभप प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पिटल आकुर्डी, संजय काळे सभागृह, साई अंब्रेला संभाजीनगर दवाखाना, रोटरी क्लब सेंटर, घरकुल दवाखाना चिखली, महापालिका शाळा जाधववाडी, रुपीनगर शाळा, यमुनानगर रुग्णालय, प्राथमिक शाळा म्हेत्रे वस्ती, तळवडे समाज मंदिर शाळा, स्वामी विवेकानंद बॅडमिंटन हॉल, जिजामाता पार्क फुलेनगर, आचार्य अत्रे सभागृह, संत तुकारामनगर, नेहरुनगर उर्दु शाळा, एसएस अजमेरा स्कुल, संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल इंद्रायणीनगर, अंकुशराव लांडगे नाट्यगृह भोसरी, अहिल्याबाई होळकर शाळा सांगवी, निळु फुले नाट्यगृह सांगवी, खिवंसरा हॉस्पिटल थेरगाव, पिंपळेनिलख इंगोले शाळा, आबाजी रामभाऊ भूमकर प्राथमिक शाळा भूमकर वस्ती, मारुती गेनू कस्पटे प्राथमिक शाळा, कांतीलाल खिंवसरा पाटील प्राथमिक शाळा मंगलनगर, थेरगाव, भाटनगर दवाखाना, अण्णासाहेब मगर शाळा पिंपळेसौदागर, नवीन जिजामाता रुग्णालय, फकीरभाई पानसरे उर्दू शाळा चिंचवड स्टेशन, जुने तालेरा रुग्णालय, गुरुद्वारा वाल्हेकरवाडी, कामत हॉस्पिटल पिंपरी नर्सिंग स्कुल चिंचवड, मोरेश्वर भोंडवे कार्यालयाजवळ पुनावळे आणि मल्हारराव विठ्ठल तरस मराठी महापालिका शाळा विकासनगर, किवळे या 35 केंद्रांवर 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना लस उद्या कोविशिल्डची लस मिळणार आहे.
तर, ज्या 45 वर्षांपुढील नागरिकांनी, एचसीडब्ल्यू आणि फ्रंट लाईन वर्कर यांनी पूर्वी ‘कोविशिल्ड’ या लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्यांना ‘कोविशिल्ड’ या लसीचा दुसरा डोस हा 12 ते 16 आठवडयांच्या दरम्यान (84ते 112 दिवस) देण्यात येणार आहे. उद्या 28 केंद्रांवर कोविशिल्डचा पहिला, दुसरा डोस देण्यात येणार आहे.
‘कोविशिल्ड’चा पहिला, दुसरा डोस ‘या’ 28 केंद्रांवर मिळणार!
हेडगेवार जलतरण तलाव, ईएसआयएस हॉस्पिटल मोहननगर, महापालिका कन्या शाळा चिखली, आरटीटीसी सेंटर, यमुनानगर रुग्णालय, स्केटिंग ग्राऊंड यमुनानगर, महापालिका शाळा खराळवाडी, मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल, दीनदयाळ शाळा पिंपरी, क्वालिटी सर्कल भोसरी, सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा मोशी दवाखाना, छत्रपती शाहु महाराज प्राथमिक विद्यालय दिघी, पंडित जवाहरलाल नेहरु शाळा च-होली, गंगोत्री पार्क दिघी, नवीन भोसरी रुग्णालय, गणेश इंग्लिश स्कुल दापोडी, शकुंतला शितोळे शाळा जुनी सांगवी, बालाजी लॉन्स जुनी सांगवी, कासारवाडी दवाखाना, महापालिका शाळा वाकड, महापालिका शाळा रहाटणी, महापालिका शाळा पवनानगर काळेवाडी, कर्मवीर भाऊराव पाटील वाघेरे ड प्रभाग, महापालिका शाळा किवळे, बिलजीनगर दवाखाना, बापूराव ढवळे प्राथमिक शाळा पुनावळे, अश्विनी मेडिकल फाउंडेशन आणि महापालिका शाळा वाल्हेकरवाडी या केंद्रावर कोविशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस उद्या सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत दिला जाणार आहे. तर, परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या18 वर्षापुढील विद्यार्थ्यांना नवीन जिजामाता रुग्णालयात लस देण्यात येणार आहे.
‘कोव्हॅक्सिन’चा पहिला, दुसरा डोस या केंद्रांवर मिळणार!
सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा भोसरी, नताशा आय क्लिनीक पिंपळेसौदागर (कोविन अॅपवर 100 टक्के ऑनलाईन बुकिंग करुन स्लॉट बुक करणे), पिंपळेगुरव माध्यमिक शाळा, यशवंतराव प्राथमिक महापालिका शाळा ग प्रभाग या केंद्रांवर 45 वर्षांपुढील नागरिकांना ‘कोव्हॅक्सिन’चा पहिला, दुसरा डोस 100 च्या क्षमतेने देण्यात येणार आहे.