breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चिखली-मोशीतील नागरिकांना ‘हॅपी स्ट्रीट’ची भुरळ

स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; गर्दीचा उच्चांक
 प्रभाग क्रमांक ३ मधील भाजपाच्या पदाधिकाऱ्यांचा उपक्रम

पिंपरी ।प्रतिनिधी
‘‘हॅप्पी स्ट्रीट-२०२२’’या कार्यक्रमाने चिखली-मोशीतील रहिवाशांना अक्षरश: भुरळ घातली. झुम्बा डान्स, स्केटिंग, मर्दानी खेळ, मल्लखांब, दांडपट्टा, कराटे अशा खेळांसह सांस्कृतिक कार्यक्रमाला नागरिकांनी तुफान प्रतिसाद दिला.
भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून चिखली-मोशी येथील वुड्सविल्ले फेस २ या ठिकाणी रविवारी ‘हॅपी स्ट्रीट-2022’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते निलेश बोराटे, निखील बोऱ्हाडे, श्री दत्त दिगंबर महिला पतसंस्थेच्या अध्यक्षा मंगल जाधव, भाजपा महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा सोनम जांभूळकर, मंगेश हिंगणे यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम झाला.रविवारी सकाळी या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आवर्जून उपस्थिती लावली. शेकडोंच्या संख्येत नागरिक लहान मुले यावेळी उपस्थित होते.

यावेळी कामगार नेते सचिन लांडगे, नगरसेविका सारिका बोऱ्हाडे, स्वीकृत नगरसदस्य सागर हिंगणे, चिखली-मोशी हाउसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे, नितीन बोऱ्हाडे, मंगेश हिंगणे, सागर हिंगणे, जितू बोराटे, अतुल बोराटे, रविंद्र जांभूळकर, सतीश जरे, राजेश सस्ते, संदेश आल्हाट आदी उपस्थित होते.

गेल्या दोन वर्षापासून कोरोना महामारीच्या निर्बंधामुळे नागरिकांना अनेक सार्वजनिक उपक्रम, कार्यक्रम यांना मुकावे लागले. त्यामुळे एक प्रकारे नागरिकांना चांगला बदल मिळावा आणि विविध कार्यक्रमांचा आस्वाद घेता यावा यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे आयोजकांनी सांगितले. यावेळी मराठी चित्रपट अभिनेत्री मानसी नाईक यांची विशेष उपस्थिती होती. झुम्बा डान्स, मर्दानी खेळ, मल्लखांब या सर्वच खेळांना नागरिकांची विशेष पसंती मिळाली. विविध स्पर्धा आणि खेळांमधील विजेत्यांना ५ टॅब, १० सायकल आणि ५०० आकर्षक बक्षीसांचे वाटप करण्यात आले.

पैलवान आला गं.. गाण्यावर महेश लांडगे थिरकले.. !
अभिनेत्री मानसी नाईक या हॅप्पी स्ट्रीट-२०२२ च्या प्रमुख आकर्षण होत्या. त्यांनी बहारदार नृत्य सादर करुन उपस्थित नागरिकांची दाद मिळली. विशेष म्हणजे, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणातील पैलवान अशी ओळख असलेले आमदार महेश लांडगे यांनाही ‘‘पैलवान आला गं… पैलवान आला…’’ या गाण्यावर ठेका धरण्याचा मोह आवरला नाही.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button