पिंपरी गुरवमधील मतदान केंद्रावर गोंधळ; निवडणूक अधिकाऱ्यांच्या गाडीसमोर बसून आंदोलन

पिंपरी चिंचवड | पिंपरी गुरव येथील प्रभाग क्रमांक २९ मधील कल्पतरू सोसायटीतील मतदान केंद्रावर मतदानाच्या वेळी मोठा गोंधळ झाला. महिला उमेदवाराचे पती राहुल जवळकर यांनी थेट निवडणूक निर्णय अधिकारी (आरओ) यांच्या गाडीसमोर बसून आंदोलन केल्याने परिसरात तणाव निर्माण झाला.
मतदार याद्यांमध्ये गंभीर त्रुटी असून बोगस मतदान सुरू असल्याचा आरोप आंदोलकांकडून करण्यात आला. तसेच निवडणूक प्रक्रियेत निवडणूक आयोग व पोलिस बळाचा गैरवापर केला जात असल्याचाही आरोप यावेळी करण्यात आला आहे.
हेही वाचा : PCMC निवडणूक: ‘‘माझं मत स्वाभिमानी पिंपरी-चिंचवडकरांना समर्पित’’ : आमदार महेश लांडगे
या घटनेमुळे मतदान केंद्र परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण होते. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला. दरम्यान, घटनेबाबत निवडणूक प्रशासनाकडून पुढील चौकशी करून आवश्यक ती कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.




