सिटी प्राईड स्कूल मध्ये ज्योतिबा फुले यांचा स्मृतिदिन उत्साहात साजरा
![Celebration of Jyotiba Phule's Memorial Day at City Pride School](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/11/pjimage-2021-11-29T141212.222.jpg)
पिंपरी चिंचवड | रहाटणी येथील क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाउंडेशन संचलित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या वतीने क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले यांचा स्मृतिदिन नुकताच साजरा करण्यात आला. ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस संस्थेचे संस्थापक श्री अरुण चाबुकस्वार सर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका असावरी घोडके, सचिन कळसाईत, शोभा श्रीकांत, सिल्व्हीनिया जाधव यांच्यासह राजकीय, सामाजिक, क्षेत्रातील मान्यवर तसेच शिक्षक व शिक्षिकेत्तर कर्मचारी विद्यार्थी- पालक उपस्थित होते.
यावेळी शिक्षकांनी ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकत संस्थापक अरुण चाबुकस्वार म्हणाले, देशाच्या आणि मानवाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शिक्षणाची अत्यंत आवश्यकता आहे. दरम्यान, ज्योतिबाच्या अनेक पैलूंवर विद्यार्थ्यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमप्रसंगी मयुरी सिंगलकर यांनी सूत्रसंचालन केले व शितल नागरे यांनी आभार मानले.