breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चोविसावाडी, चऱ्होली लोकवस्तीतील नियोजित कचरा संकलन केंद्राचे काम रद्द करा

चिखली-मोशी-चऱ्होली-पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचे आयुक्तांना निवेदन

पिंपरी | प्रतिनिधी

चोविसावाडी, चऱ्होली येथील तनिष ऑर्चिड फेज-2, डेस्टिनेशन ओसियान या सहकारी गृहरचना संस्थेच्या बाजूला लोकवस्तीमध्ये कचरा संकलन केंद्र उभारण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्याचा नागरिकांना होणारा त्रास पाहता हे काम करीत रद्द करावे अशी मागणी चिखली मोशी चरोली पिंपरी चिंचवड हाऊसिंग फेडरेशनच्या वतीने करण्यात आली. आयुक्त शेखर सिंह यांना दिलेल्या निवेदनात संजीवन सांगळे यांनी ही मागणी केली.

निवेदनात नमूद केले आहे की, चोविसावाडी, चऱ्होली येथे आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून महापालिकेच्या या आरक्षित जागेवर कचरा संकलन केंद्र चालू करण्याचे प्रयोजित आहे. आपल्या मनपातर्फे चालू करण्यात येत असलेल्या या कचरा संकलन केंद्राच्या शेजारीच तनिष ऑर्चिड फेज -1, तनिष ऑर्चिड फेज -2, डेस्टिनेशन ओशियान, ग्लोबल हाईट या आणि इतर सहकारी गृहरचना संस्था आहेत. हा सर्व रहिवासी परिसर असून या भागामध्ये 30 पेक्षा जास्त सहकारी गृहरचना संस्था आहेत. १० ते १५ हजार सोसायटीधारक या ठिकाणी राहतात. आपल्या या प्रायोजित कचरा संकलन केंद्रामुळे या भागामध्ये असणाऱ्या सर्व नागरिकांना विविध प्रकारच्या समस्याला सामोरे जावे लागू शकते.

हेही वाचा     –      सुप्रिया सुळेंवर सुनेत्रा पवारांचे ५५ लाखांचे कर्ज; एकूण संपत्ती किती?

या ठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण होऊन साथीचे आजार पसरवू शकतात. त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या वाहनांची जास्त प्रमाणात ये जा वाढून या भागातील सर्व सोसायटीधारकांना याचा खूप मोठे प्रमाणात त्रास होऊ शकतो. त्यामुळे रहिवासी भागामध्ये कचरा संकलन केंद्र करण्यास आमच्या फेडरेशनचा पूर्वीपासूनच विरोध आहे. त्यामुळ सदरील कचरा संकलन केंद्राचे काम ताबडतोब थांबवून येथील कचरा संकलन केंद्र हे ज्या ठिकाणी रहिवासी भाग नाही, ज्या ठिकाणी जास्त प्रमाणात नागरिक राहत नाहीत, अशा ठिकाणी स्थलांतरित करावे. अन्यथा या भागातील सर्व सोसायटीधारकांना एकत्र घेऊन आपल्या महापालिकेविरोधात विरुद्ध खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून चऱ्होली येथील चोविसावाडी या लोकवस्तीच्या ठिकाणी कचरा संकलन केंद्र चालू करण्याचे काम महानगरपालिकेकडून चालू करण्यात आले आहे.आमच्या फेडरेशनची पूर्वीपासूनच भूमिका आहे की, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सहकारी गृह रचना संस्था आहेत, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहे अशा ठिकाणी कचरा संकलन केंद्र करण्यास आमचा विरोध आहे. एक तर पूर्ण पिंपरी चिंचवड शहराचा कचरा आमच्याच भागात मोशी येथे कचरा डेपो मध्ये टाकला जातो आणि परत आमच्याच चऱ्होली या भागात अशा प्रकारचे कचरा संकलन केंद्र उभारणे हा म्हणजे आमच्यावरती अन्याय आहे. त्यामुळे महानगरपालिकेने हे काम त्वरित थांबवावे अन्यथा याबाबत उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल.

– संजीवन सांगळे,अध्यक्ष -चिखली-मोशी-चऱ्होली-पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशन.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button