CAA, NRC, NPR च्या विरोधात अहिंसक मार्गाने लढा सुरू ठेऊ
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/13-4.jpg)
पिंपरी – चिंचवड संविधान बचाव समितीचा निर्धार
पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|
सर्वोच्च न्यायालयामध्ये CAA, NRC, NPR या जाचक कायद्याविरुधात आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावनी झाली, या सुनावनी दरम्यान दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला चार आठवड्यात आपले म्हणने मांडण्यासाठी सांगितले. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय व भारतीय संविधानाचा आदर करत १७ जानेवारीला सुरू झालेले सत्याग्रह आंदोलन आम्ही स्थगीत करण्याचा निर्णय घेतला आहे, १९ फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयात याच प्रकरणावर सुनावनी होणार असून, या सुनावनी आगोदर १२ ते १४ फेब्रुवारी दरम्यान महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा (भीमसृष्टी) येथे धरणे आंदोलने करणार असून दरम्यानच्या काळात शहरातील विविध संविधानप्रेमी व सामाजिक चळवळीतील संघटना मिळून आंदोलनाची शक्ती वाढविण्यात येईल असे,संविधान बचाव समिती पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष मानव कांबळे यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले की, शहरातील वेगवेगळ्या भागात जाऊन या कायद्यामुळे सर्व समाज घटकांवर होणारे दुष्परिणाम, तसेच या कायद्यातील त्रुटी या विषयी जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
यावेळी १७ ते २२ या कालावधीमध्ये कुल जमाती तंजीम, पिंपरी चिंचवड शहर, नागरी हक्क सुरक्षा समिती, भारतीय संविधान दिन सोहळा समिती, बौद्ध समाज विकास महासंघ, मराठा सेवा संघ-पिंपरी चिंचवड शहर, संभाजी ब्रिगेड, छावा मराठा युवा महासंघ, पिं.चिं., महात्मा फुले समता परिषद, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, ओबीसी संघर्ष समिती, बारा बलुतेदार संघटना, रयत विद्यार्थी विचारमंच, समता सैनिक दल, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक समिती, सूर्योदय मित्रमंडळ, पिंपरी, पंचशील बुद्ध विहार थेरगाव, जमात ए इस्लामि हिंद पिंपरी-चिंचवड, शाक्यमुनी चॅरिटेबल ट्रस्ट, सम्यक विद्यार्थी आंदोलन, भारतीय बौद्ध महासभा, अपना वतन संघटना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर युवामंच निगडी, संत गुरूरविदास विचार समिती, संत रोहिदास समाज उन्नती संस्था काळेवाडी, रिपब्लिकन कामगार सेना, कष्टकरी कामगार पंचायत, रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद, राष्ट्रीय समाज पक्ष, भिमशाही युवा संघटना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रुप, पिंपरी, युवा रत्न सेवा समिती, उरूवेला महाबुद्ध सेवा ट्रस्ट, निगडी, तक्षशिला बुद्ध विहार विकास संघ, थेरगाव, दलित पँथर, पिंपरी, लोकशाही संस्था पिंपरी, स्टुंडस् इस्लामिक ऑर्गनायजेशन, डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया, भीम आर्मी संघटना, पिपल्स रिपब्लिकन पार्टी, रिपब्लिकन सेना, लहूजी सेना, पिं.चिं. तसेच पिंपरी चिंचवड शहरातील सर्व पुरोगामी विचार सरणीचे नागरिक सहभागी होऊन या संपूर्ण पाच दिवसाच्या अहिंसेच्या मार्गावर चालणाऱ्या सत्याग्राचे नियोजन संघटनांच्या कार्यकर्त्यांनी केले.