breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
‘रेमडिसिव्हिरची खरेदी करा; अन्यथा महापालिकेस टाळे ठोकू’
पिंपरी |महाईन्यूज|
‘रेमडिसिव्हिर’ इंजेक्शनची तातडीची गरज असताना महापालिका प्रशासन अगतिकपणे स्थायी समितीच्या ठराव पास होण्याची वाट पहात आहे. मागील स्थायी समितीच्या बैठकीत टक्केवारीसाठी ‘रेमडिसिव्हिर’ इंजेक्शन खरेदी ठराव स्थगित करण्यात आला. टक्केवारीसाठी अत्यवस्थ रुग्णांच्या जिवाशी खेळणे हे मानवतेला कलंक आहे. आयुक्तांनी स्वतः:च्या अधिकारात ‘रेमडिसिव्हिर’ची खरेदी करावीत. अन्यथा महापालिकेस टाळे ठोकू, असा इशारा देत शहर राष्ट्रवादीचे युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेसमोर निदर्शने केली.
युवक शहराध्यक्ष विशाल वाकडकर, राष्ट्रवादी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, नगरसेवक योगेश बहल, वैशाली घोडेकर, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, प्रवक्ते फझल शेख, शेखर काटे, कुणाल थोपटे, उपाध्यक्ष प्रसाद कोलते, अकबर मुल्ला, रोहित नखाते, मयूर जाधव आदींनी सहभाग घेतला.