परमार कॉम्प्लेक्स हॉटल पुनागेट समोर पीएमपीएमएलचा बस थांबा उभारावा
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे देहूरोड शहराध्यक्ष किशोर गाथाडे यांचे पीएमलीएमएलच्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन
![Parmar Complex, Hotel Punagate, PMPML, Bus Stop should be set up,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/06/pmpml-nivedan--780x470.jpg)
पिंपरीः
मुंबई-पुणे महामार्गावरील निगडी येथील परमार कॉम्प्लेक्स, सिद्धिविनायक नगरी, दत्तनगर, श्री विहार कॉलनी, निगडी वसाहत, सेक्टर 22 निगडी या भागातील नागरीकांना मुंबई-पुणे तसेच पिंपरी-चिंचवडक शहरातील अंतर्गत प्रवासासाठी निगडी येथील परमार कॉम्प्लेक्स हॉटेल पुनागेटसमोर प्रवाशांना जाण्या-येण्यासाठी पीएमपीएमएलचा बस थांबा उभारावा, अशा मागणीचे निवदेन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे देहुरोड कार्याध्यक्ष किशोर गाथाडे यांनी पीएमपीएमएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश बकोरिया यांना दिले आहे.
सदर निवेदनात गाथाडे यांनी म्हटले आहे की, शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरीक, महिला वर्ग यांना मुंबई-पुणे महामार्ग, परमार कॉम्प्लेक्स समोर लोखंडी निवारा बस स्टॉप बांधून देण्यात यावा. जेणेकरुन सिद्धिविनायक नगर, दत्तनगर, श्रीविहार निगडी वसाहत, सेक्टर 22 निगडी येथील रहिवाशी व प्रवासी यांना या मार्गावरील बस थांबा येथे बसण्यासाठी निवारा शेडची व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात यावी. प्रत्येक गाडी थांबविण्यासाठी आपण स्वतः दखल घ्यावी, असे गाथाडे यांनी निवेदनात म्हटले आहे. सदर निवेदनावर येथील सुमारे 15 रहिवाशांनी स्वाक्षरी केली आहे.