प्रियदर्शनी इंग्लिश स्कुलमध्ये घरफोडी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/11/theft-672x420.jpg)
पिंपरी l प्रतिनिधी
इंद्रायणीनगर भोसरी येथील प्रियदर्शनी इंग्लिश स्कुलमध्ये दोन अनोळखी चोरट्यांनी चोरी केली. शाळेच्या ऑफिसमधून रोख रक्कम आणि दोन मोबाईल फोन असा दोन लाख 67 हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे. ही घटना सोमवारी (दि. 21) मध्यरात्री सव्वाएक वाजता घडली.
संदीप श्रीकृष्ण सातार्डेकर (वय 57, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी मध्यरात्री सव्वाएक वाजताच्या सुमारास दोन अनोळखी चोरट्यांनी प्रियदर्शनी इंग्लिश स्कुलच्या ऑफिसचे लॅचलॉक उचकटून तोडले. त्यानंतर ऑफिसमधील काउंटरच्या ड्रॉवरमधून दोन लाख 57 हजार रुपये रोख रक्कम आणि प्रत्येकी पाच हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन असा एकूण दोन लाख 67 हजारांचा ऐवज चोरून नेला. पोलीस उपनिरीक्षक सचिन चव्हाण तपास करीत आहेत.