पिंपरी / चिंचवडपुणे

खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त ब्रेस्ट कॅन्सर तपासणी शिबिर

तळेगाव | तळेगाव दाभाडे येथील मेधावीण फाउंडेशन तर्फे खासदार सुप्रिया सुळे यांचा वाढदिवस ब्रेस्ट कॅन्सर (स्तनाचा कर्करोग) तपासणी शिबिर व वृक्षारोपणाने साजरा करण्यात आला.हा कार्यक्रम नगरपरिषदेच्या विश्वनाथराव भेगडे क्रीडा संकुल येथे घेण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडेच्या अध्यक्षा काजल गारोळे यांच्या हस्ते करण्यात आले.या वेळी मेधाविन फाउंडेशनच्या संस्थापिका वैशाली दाभाडे, नगरसेविका मंगल भेगडे, संगीता शेळके, मावळ तालुका संघटक ज्योती शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस युवती मावळ तालुकाध्यक्ष निशा

पवार, शिवानी सोनवणे, रश्मी जगदाळे, श्रुतिका कांबळे, अल्पना हुंडारे आदी उपस्थित होत्या.या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य डॉ. दीपाली झंवर (भंडारी), डॉ. राणी बच्चे, डॉ. लता पुणे यांनी केले. डाॅक्टर टीमने ब्रेस्ट कॅन्सर विषयी माहिती दिली. त्यानंतर उपस्थित महिलांची तपासणी करण्यात आली.वैशाली दाभाडे यांनी उपस्थित महिलांना स्वतःच्या आरोग्या विषयी जागरुक राहण्याचे आवाहन केले. डॉ दीपाली भंडारी(झंवर)यांनी कर्क रोगाची आव्हाने, लक्षणे, तपासणी व आजार टाळण्याच्या विषयी मार्गदर्शन केले. डॉ. राणी बच्चे यांनी महिलांच्या आरोग्याबाबत होणाऱ्या बदला विषयी माहिती दिली. तर डॉ. लता पुणे यांनी आयुर्वेदिक उपचाराने विषयी माहिती दिली.

मेधाविन फाउंडेशनच्या संस्थापिका वैशाली दाभाडे यांनी प्रास्ताविक व नियोजन केले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button