एकजूट, समर्पण अन् लोकसंपर्कातून भाजपाचा विजय निश्चित!
पिंपरी-चिंचवड भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांचा कार्यकर्त्यांना विश्वास

– लोकनेते स्व. गोपिनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त ‘‘कार्यकर्ता एकत्रिकरण मेळावा
पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी
आगामी महापालिका निवडणुकीत पक्षाची-कार्यर्त्यांची “एकजूट, समर्पण आणि सततची लोकसंपर्क मोहीम आणि विकासकामांच्या बळावर भाजपाचा विजय अटळ आहे,” असे ठाम वक्तव्य शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी केले.
भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, देशाचे माजी ग्रामविकास मंत्री व राज्याचे लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त शहर भाजपाच्या वतीने ‘‘कार्यकर्ता एकत्रिकरण मेळावा’’ उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस स्व. मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष काटे बोलत होते.

शहर भाजपाच्या वतीने आयोजित मेळाव्यात सुरुवातीला स्व. मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर शहर कार्यकारिणीचा विस्तार जाहीर करत अनेक कार्यकर्त्यांना उपाध्यक्ष, सचिव अशा विविध पदांवर नियुक्त करण्यात आले. घोषणेनंतर सभागृहात उपस्थित कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त करत टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.
हेही वाचा – Good News : डुडुळगाव- किवळेतील ‘‘घरकुलाचे स्वप्न’’ होणार साकार!

शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या कार्याचे स्मरण करून सांगितले की, “मुंडे साहेबांचे व्यक्तिमत्त्व हे कार्यकर्त्यांसाठी प्रेरणागौरव आहे. त्यांच्या आदर्शांवर चालतच आपण भाजपाला घराघरांत पोहोचवू शकतो.” आगामी महापालिका निवडणुकीकडे कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे आणि संघटित प्रयत्नांतून प्रचंड मताधिक्याने पक्षाला विजय मिळवून द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
मेळाव्यास संघटन सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, सरचिटणीस वेशाली खाड्ये, मधुकर बच्चे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशीव खाडे, माजी उपमहापौर केशव घोळवे, माजी उपमहापौर सचिन चिंचवडे, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी नगरसेवक योगीता नागरगोजे, माउली थोरात, राजू दुर्गे, महेश कुलकर्णी, कुणाल लांडगे, मंडल अध्यक्ष गणेश ढोरे, हर्षद नढे, संजय मंगोडीकर यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून कार्यकर्त्यांनी मुंडे साहेबांच्या आदर्शांवर चालत संघटना अधिक मजबूत करण्याचा संकल्प व्यक्त केला.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
“एकजूट आणि कटिबद्धतेतच आमचे सामर्थ्य आहे. प्रत्येक कार्यकर्त्याचा समर्पण आणि मेहनतच भाजपाला विजयी बनवते. आपण एकत्र काम करून, स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या आदर्शावर चालत, समाजाच्या सेवेसाठी नेहमी पुढे राहूया. प्रत्येक घरात भाजपाचे विचार पोहोचविणे आणि शहराला यशाच्या शिखरावर पोहोचवणे हेच आमचे उद्दिष्ट आहे.”
— शत्रुघ्न काटे, शहराध्यक्ष, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.




