breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी विधानसभेसाठी भाजपच्या तेजस्विनी कदम तीव्र इच्छुक..!

पिंपरी : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे यांना मताधिक्य मिळवून देण्यात भारतीय जनता पार्टीच्या निष्ठावंत पदाधिका-यांना यश आले. त्यापैकी एक असणा-या भाजपा युवा मोर्चाच्या प्रदेश सचिव तेजस्विनी कदम यांनी पिंपरी विधानसभेची गणिते आखायला सुरुवात केली आहे. पिंपरीतून त्या तिव्र इच्छुक असून भाजपाच्या वरीष्ठ पातळीवरुन त्यांना ताकद मिळाल्यास त्यांच्या विजयाचा मार्ग सोपा होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात केली जात आहे.

उच्च शिक्षणानंतर तेजस्विनी कदम यांनी विरांगणा सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून निगडी प्राधिकरणासह पिंपरी-चिंचवड शहरात समाजकार्याला सुरुवात केली. पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरुन त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना पक्षीय पातळीवर काम करण्याची संधी देण्यात आली. फाऊंडेशनच्या माध्यमातून पिंपरी विधानसभा मतदार संघातच नव्हे तर पिंपरी-चिंचवड शहरामध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून त्या सामाजिक कार्य करत आल्या आहेत. तळागाळातील घटकापर्यंत पोहोचण्याची त्यांची धडपड पाहून त्यांना 2014 मध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप आणि पक्षाचे तत्कालीन प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्यावर भारतीय जनता युवती मोर्चा शहर युवती अध्यक्ष पदाची धुरा सोपविली.

हेही वाचा –  महिन्याच्या पहिल्या दिवशी इंधनाचे सुधारित दर जाहीर

पक्षाच्या माध्यमातून त्यांनी पिंपरी विधानसभेत नागरिकांचे प्रश्न, समस्या सोडविण्यावर भर दिला. त्यांच्या कामाची धडाडी पाहून भाजपाचे माजी शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या कार्यकाळात त्यांना भाजपा युवा मोर्चा शहर सरचिटणीस पदावर काम करण्याची संधी मिळाली. या पदाचा उपयोग त्यांनी समाजातील नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी केला. दरम्यान, महिलांचे संघटन मजबूत करुन पक्षाची ध्येय धोरणे बळकट करण्यावर त्यांनी अधिक भर दिला. त्यांच्या कार्याचा प्रभाव पाहून पक्षाच्या वरीष्ठ नेतृत्वाने त्यांच्यावर भाजपा युवती मोर्चाच्या प्रदेश सचिव पदाची धुरा सोपविली. या पदावर काम करताना त्यांनी राज्यभराचा दौरा केला.

दरम्यान, तेजस्विनी कदम यांनी 2019 ची विधानसभा निवडणूक लढण्याची तयारी केली होती. मात्र, त्यावेळी पिंपरी मतदार संघ युतीतील मित्र पक्षाला गेल्याने त्यांना माघार घ्यावी लागली. आता 2024 साठी त्यांनी पुन्हा कामाला सुरुवात केल्याने भाजपकडून त्या प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत. त्यातच नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी खासदार श्रीरंग बारणे यांना पिंपरी विधानसभेतून मताधिक्य मिळवून देण्यासाठी अहोरात्र कार्य केले. यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढल्याने आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी पिंपरी मतदार संघावर दावा ठोकला आहे. निवडणुकीचे तिकीट मिळवण्यासाठी त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर फिल्डींग लावल्याची चर्चा आहे. येणा-या काळात तेजस्विनी कदम या पिंपरी विधानसभेसाठी भाजपाचा प्रमुख चेहरा म्हणून समोर येतील, असे पक्षातील काही पदाधिकारी सांगत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button