संघटनेच्या बळावर महापालिकेत पुन्हा भाजपची सत्ता येईल : भाजपा मुख्य प्रवक्ते अमोल थोरात
![BJP disciplined party; There is no place for anti-party activities: Spokesperson Amol Thorat](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/09/b2247f5a-19f6-45fd-b9d2-62197f65fd32.jpg)
पिंपरी चिंचवड | भाजप ही संघटना ओरिएंटल पार्टी असून बूथरचना मजबूत केली आहे. त्यामुळे कोणी इकडे-तिकडे पळाले. तरीही, संघटनेच्या बळावर पिंपरी-चिंचवड महापालिकेत पुन्हा भाजपचीच सत्ता येईल, असा विश्वास शहर भाजपचे प्रवक्ते अमोल थोरात यांनी व्यक्त केला.राष्ट्रवादीचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भाजपमधील नगरसेवक संपर्कात असलेल्या वक्त्यावर भाजप प्रवक्ते अमोल थोरात म्हणाले की, भाजपचा मतदार जागरूक आहे. तो पक्ष सोडून जाणाऱ्यांना जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही.बारामती लोकसभा मतदारसंघ असताना लोकसभेला शरद पवार यांनाही पिंपरी-चिंचवडमध्ये मताधिक्य मिळत नसे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर लोकांचा विश्वास आहे. त्यामुळे शिवसेनेचे मावळातील खासदार श्रीरंग बारणे यांनाही मदत झाली. त्यामुळे पार्थ पवार यांना पराभवाची धूळ चाखावी लागली.
चिंचवड विधानसभेतून लक्ष्मण जगताप व भोसरी मतदारसंघातून महेश लांडगे हे दोन्हीही भाजपचे आमदार प्रचंड बहुमतांनी विजयी झाले. ज्या पक्षाला चिंचवड व भोसरी मतदार संघात स्वतःचा उमेदवार सुद्धा देता आला नाही, प्रत्यक्षात अपक्ष उमेदवार पुरस्कृत करण्याची नामुष्की ओढवली. त्यांनी भाजपावर टीका करणे चुकीचे ठरेल.महापालिका निवडणुकीसाठी भाजपने तयारी केली आहे. शहरातील 1308 बूथच्या माध्यमातून 30 हजार लोकांपर्यंतची टीम तयार केली आहे. तरुण मतदारांचा भाजपवर असलेला विश्वास व पक्षसंघटन मजबूत असल्याने भाजप महापालिकेत पुन्हा सत्तेवर येईल, असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला.
काँग्रेसवालेच बेरोजगार झाले
पालिकेत झालेला पराभव लपविण्यासाठी अजित पवार भाजपवर वॉर्ड रचनेबाबत खोटे-नाटे आरोप करत आहेत. त्यामुळे जनतेने यांना घरी बसविले, हे त्यांनी ध्यानात घेतले पाहिजे. देशात सध्या काँग्रेसवालेच बेरोजगार झाले आहेत. म्हणून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा वाढदिवस बेरोजगार दिन म्हणून साजरा केला, असा टोला थोरात यांनी काँग्रेसला लगावला.