पिंपरी / चिंचवड

चऱ्होली-वडमुखवाडीत भाजपचा झंझावात; महायुतीच्या उमेदवारांना सोसायट्यांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद

मिशन- PCMC : भाजपकडून परिसराच्या सर्वांगीण विकासाचा निर्धार

पिंपरी-चिंचवड : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चऱ्होली फाटा, वडमुखवाडी व चोवीसावाडी परिसरात भारतीय जनता पार्टीकडून प्रचाराचा जोरदार झंझावात सुरू असून, महायुतीच्या उमेदवारांना नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. माजी महापौर नितीनआप्पा काळजे, श्री. सचिनभाऊ तापकीर, सौ. अर्चनाताई सस्ते व सौ. सारिका गायकवाड यांनी परिसरातील विविध गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये प्रत्यक्ष भेटी देत प्रचार केला.

सोसायट्यांमध्ये थेट संवादावर भर

साईमंदिर परिसर, आझाद नगर तसेच चोवीसावाडीतील अनेक सोसायट्यांमध्ये उमेदवारांनी नागरिकांशी थेट संवाद साधला. यावेळी स्थानिक प्रश्न, रखडलेली विकासकामे तसेच नागरी सुविधांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेषतः युवक व नवमतदारांमध्ये या प्रचार दौऱ्याला मोठा प्रतिसाद मिळत असून, ‘युथ सोसायट्यां’मध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

हेही वाचा – आम्ही संविधान आणखी मजबूत करू : मंत्री रामदास आठवले

विकास हाच केंद्रबिंदू

प्रचारादरम्यान उमेदवारांनी परिसराच्या सर्वांगीण विकासाचा निर्धार व्यक्त केला. रस्ते, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, वाहतूक व मूलभूत नागरी सुविधांवर विशेष भर देण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले. “परिसराचा कायापालट करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे मत माजी महापौर नितीनआप्पा काळजे यांनी यावेळी व्यक्त केले.

भाजपच्या बाजूने वातावरण

दौऱ्यादरम्यान अनेक ठिकाणी नागरिकांनी उमेदवारांचे जंगी स्वागत केले. प्रभागातील सोसायटीधारक व स्थानिक नागरिकांनी एकत्र येत भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना बहुमताने निवडून देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. या प्रचार दौऱ्यामुळे संपूर्ण परिसरात भाजपमय वातावरण निर्माण झाले असून, निवडणूक प्रचारात महायुतीने मोठी आघाडी घेतल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

“चऱ्होली-वडमुखवाडी परिसरातील प्रत्येक नागरिकाच्या मूलभूत गरजा पूर्ण करणे हेच आमचे पहिले प्राधान्य आहे. रस्ते, पाणी, स्वच्छता, आरोग्य आणि युवकांसाठी संधी निर्माण करून या भागाचा सर्वांगीण व शाश्वत विकास साधण्याचा आमचा संकल्प आहे. नागरिकांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही.”

– सचिन तापकीर, उमेदवार, भाजपा, प्रभाग- 3.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button