पिंपरी / चिंचवड

आमदार महेश लांडगेंच्या ‘अबकी बार 100 पार’च्या नाऱ्यावर भाजप ओबीसी मोर्चानी बांधली वज्रमुठ

पिंपरी l प्रतिनिधी

भाजपाचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष आमदार महेशदादा लांडगे यांनी येणाऱ्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीत ‘अबकी बार भाजपा 100 पार’चा नारा दिल्यानंतर भाजप ओबीसी मोर्चाने वज्रमुठ बांधली आहे. भाजप ओबीसी मोर्चा पिंपरी चिंचवड शहरामध्ये ओबीसी जोडो अभियान सुरू करणार असून पिंपरी चिंचवड शहरामध्ये ओबीसी समाजातील विविध जातीबांधवांना एकत्र आणण्याचे काम करणार आहे, असे भाजप ओबीसी मोर्चाचे शहराध्यक्ष ऋषिकेश रासकर यांनी सांगितले.

येणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या विरुद्ध भाजपा आपल्या विविध संघटनांना मोठ्या ताकदीने निवडणुकीत सक्रीय उतरवताना दिसत आहे. भाजप ओबीसी मोर्चाचे कार्य पिंपरी चिंचवड शहरामध्ये उल्लेखनीय राहीले आहे. आगामी काळात हे काम आणखी उंचीवर पोहचेल असे यावेळी पदाधिकाऱ्यांच्या बोलण्यातून जाणवले.

भाजप ओबीसी मोर्चाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आमदार योगेश आण्णा टिळेकर, भाजप पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या मिटिंगमध्ये पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख विना सोनवलकर, भाजप ओबीसी मोर्चाचे प्रभारी निखील झगडे यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी भाजप ओबीसी मोर्चाचे महाराष्ट्राचे सचिव प्रदिप सायकर, सचिव मनोज ब्राह्मणकर, सरचिटणीस कैलास सानप, अनिल राऊत, युवा अध्यक्ष राजेश डोंगरे, शंकर लोंढे, शशिकांत पुंड, नितीन साळी, अभिजीत कर्पे, सुनिल लांडगे, अमोल सहाणे, ओंकार कटारीया, सुनिल नेवाळे, राहुल नागरे, जयश्री देशमाने, किरण पांचपांडे, सविता कर्पे, श्रुतीका पुंड, यांसह अनेक भाजप पदाधिकारी उपस्थित होते

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button