भाजपच्या कामगार आघाडी प्रदेश सरचिटणीस तथा सहसंयोजक सोशल मीडिया प्रमुखपदी कामगार नेते हनुमंत लांडगे यांची निवड
![BJP leader Hanumant Landage elected as state general secretary and co-coordinator of social media](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/300b5ad1-8008-4af2-ba4c-581ceee45ff3.jpg)
पिंपरी – कामगार क्षेत्रातील प्रचंड अभ्यासू व्यक्तिमत्व व रा. स्व. संघाचे स्वयंसेवक हनुमंत लांडगे यांची भारतीय जनता पार्टी, कामगार आघाडी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा सहसंयोजक सोशल मीडिया प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे.
पक्षाकडून त्यांना नुकतेच निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले आहे. या निवडीबद्दल त्यांचा शहर भाजपकडून सत्कार करण्यात आला आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, आमदार महेशदादा लांडगे, प्रदेश प्रभारी तथा मा. मंत्री रविंद्र चव्हाण, प्रदेश मार्गदर्शक संजय केनेकर, का. आ. प्रदेश अध्यक्ष गणेश साठे, कामगार नेते बबन झिंजुर्डे व आदींचे त्यांनी आभार मानले आहेत. पक्षाने महत्वाच्या पदावर माझी निवड करुन माझ्यावरचा विश्वास द्विगुणीत केला आहे, त्याबद्दल पक्षश्रेष्ठींचा ऋणी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
हनुमत नामदेव लांडगे यांनी यापूर्वी पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाचे कामगार नेतेपद भूषविले आहे. पालिका सेवकांच्या सहकारी पतसंस्थेचे अध्यक्षपद ते महाराष्ट्र प्रदेश, भारतीय जनता पक्ष कामगार आघाडी, प्रदेश सचिव पदापर्यंतचा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. आता नव्याने भारतीय जनता पार्टी, कामगार आघाडी-महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा सहसंयोजक सोशल मीडिया प्रमुखपदाची जबाबदारी त्यांच्या शिरावर देऊन पक्षाने त्यांच्या कार्याचा बहुमान केला आहे.
त्यांच्या या निवडीबदल समाजातील सर्वच स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.