भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी बजावला मतदानाचा हक्क!
लोकशाही बळकट करण्याची प्रत्येकाने मतदान करा : शत्रुघ्न काटे

पिंपरी-चिंचवड | पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी आज आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यांनी पिंपळे सौदागर- रहाटणी या आपल्या प्रभागातील मतदान केंद्रावर जाऊन शांततेत आणि उत्साहात मतदान केले.
महानगरपालिका निवडणुकीमुळे शहरात राजकीय वातावरण तापले असून, विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि उमेदवार सकाळपासूनच मतदान केंद्रांवर दाखल होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शत्रुघ्न काटे यांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांमध्ये विशेष उत्साह दिसून आला.
हेही वाचा : माजी आमदार विलास लांडे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क!
यावेळी माध्यमांशी बोलताना शत्रुघ्न काटे म्हणाले, “मतदान करणे हे प्रत्येक नागरिकाचे पवित्र कर्तव्य आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदान करावे. पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासासाठी सक्षम आणि स्थिर नेतृत्व निवडणे अत्यंत गरजेचे आहे,” असे आवाहन त्यांनी केले.
शहरातील विविध मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदारांची गर्दी पाहायला मिळत असून, मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी प्रशासनाकडून चोख बंदोबस्त आणि आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.




