डी. वाय. पाटील पीजीडीएम इन्स्टिट्यूटमध्ये ‘बिझ टँक २०२६’चे यशस्वी आयोजन
देशभरातील १२५ हून अधिक नाविन्यपूर्ण व्यवसाय कल्पनांचे सादरीकरण

पुणे | डी. वाय. पाटील पीजीडीएम इन्स्टिट्यूट, आकुर्डी, पुणे येथे ६ फेब्रुवारी २०२६ रोजी संस्थेच्या प्रमुख वार्षिक उद्योजकता उपक्रम ‘बिझ टँक २०२६’ चे यशस्वी आयोजन करण्यात आले. हा उपक्रम पुण्यातील विरर सोल्युशन्स यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला असून, किंगडम ऑफ इस्वातिनी (दक्षिण आफ्रिका) यांच्या आंतरराष्ट्रीय पाठबळामुळे या कार्यक्रमाला जागतिक स्तराची झलक लाभली.
‘बिझ टँक’ हा विद्यार्थ्यांमधील नाविन्यपूर्ण व्यवसाय कल्पना शोधणे, त्यांना प्रोत्साहन देणे आणि सादर करण्यासाठी एक प्रभावी व्यासपीठ आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना एंजेल गुंतवणूकदार, मार्गदर्शक आणि उद्योगतज्ज्ञांसमोर प्रत्यक्ष पिचिंगचा अनुभव मिळतो. तसेच त्यांच्या कल्पनांवर उपयुक्त अभिप्राय मिळून त्या व्यावसायिक व बाजारपेठेसाठी तयार करण्याचे मार्ग खुले होतात.
बिझ टँक २०२६ ला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भारतातील सुमारे ४४ नामांकित संस्थांमधून १२५ हून अधिक व्यवसाय कल्पना सादर करण्यात आल्या. यामध्ये सिंबायोसिस इन्स्टिट्यूट, मरवाडी विद्यापीठ, आयआयएम लखनौ, व्हीआयटी भोपाळ, गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट यांसारख्या प्रतिष्ठित संस्थांचा सहभाग होता. गोवा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि गुजरात अशा चारहून अधिक राज्यांतील तसेच मुंबई, अहमदाबाद, नागपूर आदी शहरांतील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला.

विरर सोल्युशन्सने विकसित केलेल्या बहुपर्यायी एआय-आधारित मूल्यमापन प्रक्रियेनंतर अंतिम फेरीसाठी टॉप ३५ व्यवसाय कल्पना निवडण्यात आल्या.
अंतिम फेरीचे परीक्षण नामांकित एंजेल गुंतवणूकदार आणि उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांच्या पॅनेलने केले. या पॅनेलमध्ये भवेश वोरा, गिरीश साळुंखे, कुशल पिट्टी, हर्षल बोर्से, अल्हाद देशपांडे, दीपक यादव, दिव्यांश द्विवेदी, सोनिया गोवर्धन, सुमित हिरानंदानी आणि शैलेश भोर यांचा समावेश होता.
हेही वाचा : ऑनलाइन फसवणूक झाली तर आरबीआय देणार 25 हजार रुपयांपर्यंत भरपाई
या विविध आणि अनुभवी गुंतवणूकदारांच्या उपस्थितीमुळे, तसेच इस्वातिनी सरकारच्या आंतरराष्ट्रीय प्रतिनिधित्वामुळे, सहभागी विद्यार्थ्यांना जागतिक दृष्टिकोन, धोरणात्मक मार्गदर्शन आणि प्रत्यक्ष गुंतवणुकीचा अनुभव मिळाला.
बिझ टँक २०२६ चे विजेते
प्रथम क्रमांक – ₹५०,०००
डी. वाय. पाटील पीजीडीएम इन्स्टिट्यूट, आकुर्डी, पुणे
संघ सदस्य : नंदिनी जगदाळे, अंबर येन्दे
कल्पना : ISOFLOW 4
विजेत्या संघाला पाच एंजेल गुंतवणूकदारांकडून ₹६ लाखांची तात्काळ गुंतवणूक मिळाली. तसेच कृती मॅनेजमेंट कडून कंपनी नोंदणी व कायदेशीर प्रक्रियांसाठी ₹२ लाखांचे प्रायोजकत्व जाहीर करण्यात आले. याशिवाय पेटंट फाइलिंग, कंपनी नोंदणी आणि मुंबईत ऑपरेशनल सेटअपसाठी संपूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन गुंतवणूकदारांनी दिले.

द्वितीय क्रमांक – ₹२५,०००
भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था (IISER), पुणे
स्पर्धक : संजय उपाध्याय
कल्पना : FixThis
तृतीय क्रमांक – ₹१५,०००
AISSMS मॅनेजमेंट
स्पर्धक : श्रद्धेय गाडेकर
कल्पना : Durg
बिझ टँक २०२६ च्या माध्यमातून डी. वाय. पाटील पीजीडीएम इन्स्टिट्यूटने उद्योजकता, नवोन्मेष आणि उद्योग-शैक्षणिक सहकार्याबाबतची आपली कटिबद्धता पुन्हा एकदा सिद्ध केली असून, विद्यार्थ्यांना त्यांच्या कल्पनांना यशस्वी व्यावसायिक उपक्रमात रूपांतरित करण्यासाठी सक्षम केले आहे.





