नॅशनल युनियन ऑफ पोस्टल एम्प्लॉईज, पोस्टमन व एमटीएस ग्रुप सी संघटनेचे द्विवार्षिक अधिवेशन संपन्न
![Biennial convention of National Union of Postal Employees, Postmen and MTS Group C](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/postman.jpg)
पिंपरी चिंचवड | नॅशनल युनियन ऑफ पोस्टल एम्प्लॉईज, पोस्टमन व एम टी एस ग्रुप सी या संघटनेचे 19 ते 21 डिसेंबर 2021 या कालावधीत द्विवार्षिक राष्ट्रीय अधिवेशन फ्रुटवाले धर्मशाळा, आळंदी देवाची पुणे या ठिकाणी बी शिवकुमार सेक्रेटरी जनरल एफ एन पी ओ न्यु दिल्ली यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.कार्यक्रमासाठी न्यू दिल्ली येथील भारतीय टपाल विभागाचे प्रमुख विनीत पांडे (सेक्रेटरी डिपार्टमेंट ऑफ पोस्ट) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच अधिवेशनासाठी विशेष प्रतिनिधी म्हणून इंटकचे सचिव महेंद्र घरत, इंटक पुणे विभागाचे अध्यक्ष कैलास कदम, पुणे महानगरपालिकेचे सदस्य दत्ता धनकवडे, मनोहर गडेकर इंटक तसेच पुणे शहर पूर्व विभागाचे प्रवर अधीक्षक डाकघर सतीश गोपाराजू, एफ एन पी ओचे माजी सेक्रेटरी जनरल डी त्यागराजन, माजी सेक्रेटरी जनरल टी एन रहाटे, राष्ट्रीय अध्यक्ष माननीय बिदान चौधरी तसेच संघटनेचे जनरल सेक्रेटरी निसार मुजावर, क्लास3 संघटनेचे जनरल सेक्रेटरी शिवाजी वस्सीरेड्डी, आर एम एसचे जनरल सेक्रेटरी त्यागी, संघटनेचे वरिष्ठ नेते टी एन रहाटे , बी एम. घोष, एन यु पी चे माजी राष्ट्रीय अध्यक्ष गुलाब रब्बानी, राज्य सचिव आर एच गुप्ता तसेच देशभरातून प्रत्येक जिल्ह्यांमधून आलेले प्रतिनिधी उपस्थित होते.
खुल्या अधिवेशनामध्ये आपले विचार मांडताना डाक विभागाचे सचिव विनोद पांडे यांनी लॉकडाऊन कालावधीमध्ये पोस्टमन बंधूंनी दिलेल्या अतुलनीय सेवा ज्यामध्ये घरपोच औषधे, मनीऑर्डर, हॉस्पिटल मध्ये लागणारे साहित्य अत्यावश्यक पत्रे, आधार कार्ड द्वारे बँक खात्यातील रक्कम घर पोहोच कामाबाबत, पोस्टमन बंधूंचे पोस्टल विभागामार्फत खास आभार मानले. तसेच एफ एन पी ओ संघटनेच्या कामगार हिताच्या धोरणाबद्दल विशेष गौरवोद्गार काढले.
टी एन रहाटे यांनी पोस्टमन भरती संदर्भात नियमावली बदल करण्यात आली याचा आवर्जून उल्लेख केला. डी त्यागराजन माजी सेक्रेटरी जनरल यांनी बदलत्या तांत्रिक विभागामध्ये सुद्धा पोस्टमन व पोस्ट खात्याच्या महत्त्वाची भूमिका विशद केली. संघटनेचे जनरल सेक्रेटरी निसार मुजावर यांनी बाविसाव्या खुल्या अधिवेशनात उपस्थित राहिल्याबद्दल सर्व मान्यवर तसेच प्रतिनिधींचे स्वागत केले. मागील दोन वर्षांमध्ये संघटनेने राष्ट्रीय पातळीवर कामगार हितासाठी व कामगारांच्या कल्याणासाठी केलेल्या प्रयत्नांची विस्तृत माहिती दिली.
यामध्ये प्रामुख्याने कोरोना कालावधीमध्ये कार्यालयात हजर न राहू शकलेले कर्मचाऱ्यांना विशेष रजा मंजूर करणे तसेच कोरोना पीडित कर्मचाऱ्यास उपचारासाठी 90 टक्के इतकी रक्कम अॅडव्हान्स म्हणून मिळणे, सन 2018 पूर्वीच्या पोस्टमन व एम टी एस सर्व सरळ भरती मधील सर्व रिक्त जागा फक्त ग्रामीण डाक सेवकामधूनच भराव्यात यासाठी केलेल्या प्रयत्नांची सविस्तर माहिती दिली. तसेच दैनंदिन कामकाज करताना येणाऱ्या आय पी पी बी, नोडल पार्सल बटवडा, नवीन मोबाईल पुरवठा, गणवेश भत्ता वाढविणे या संदर्भातील सर्व समस्या प्रभावीपणे मांडल्या.
जनरल सेक्रेटरी शिवाजी वस्सीरेड्डी यांनी पोस्टमन मधून क्लास थ्री च्या रिक्त जागांवर तात्पुरत्या कालावधीसाठी नेमणूक करण्यात यावी तसेच सर्व प्रकारच्या रिक्त जागा भरताना ज्या राज्यांमध्ये जागा भरली जाणार आहे तेथे स्थानिक राज्य भाषा येणे अनिवार्य करण्यात यावे, अशी मागणी केली. तसेच या अधिवेशनामध्ये पुढील कार्यकारिणीची निवड करणेत आली, यामध्ये जनरल सेक्रेटरी म्हणून निसार मुजावर (महाराष्ट्र), अध्यक्ष सोमा घोष (प.बंगाल) तर खजिनदार म्हणून जगदीश शर्मा (दिल्ली) यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र आणि गोवा राज्याचे सचिव सुनील झुंझारराव तसेच पुणे रिजनल सेक्रेटरी डी आर देवकर, अध्यक्ष विनय खेडेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले.