breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भारतमातानगर दिघी ते भोसरी-आळंदी रस्ता ‘सुपरफास्ट’

भाजपा आमदार महेश लांडगे यांचा पुढाकार

वर्षानुवर्षे प्रलंबित रस्त्याचा प्रश्न अखेर निकालात

पिंपरी । प्रतिनिधी

गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणार्‍या भारमातानगर दिघी ते भोसरी-आळंदी रस्त्याच्या काँक्रीटीकरणच्या कामाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. दिघी ग्रामस्थांच्या मागणीनंतर भाजपा आमदार महेश लांडगे यांनी महापालिकेच्या संबंधित अधिकार्‍यांना सूचना दिल्या. त्यानुसार या कामाचे भूमीपूजन करण्यात आले आहे. २०१९ मध्ये जागामालक प्रशासन यांच्यातील विसंवादावर तोडगा काढून कच्चा रस्ता उपलब्ध झाला होता. आता काँक्रीटीकरणाचे काम पूर्ण करुन ‘सुपरफास्ट’ रस्ता कार्यान्वयीत करण्यात येणार आहे.

यावेळी ह.भ.प. दत्ता गायकवाड, माजी नगरसेविका निर्मला गायकवाड, माजी नगरसेविका आशा सुपे, मीना पाटील, माजी नगरसेवक सागर गवळी, विकास डोळस, कुलदीप परांडे, संजय गायकवाड, चेतन घुले, माजी सैनिक संघाचे अध्यक्ष नरेंद्रसिंग चौव्हान, आमसिध्द भीसे, धनवे, पनवर, किशोर नवले उपस्थित होते.

हेही वाचा – ‘दूरदृष्टी, अथक परिश्रम, दृढ निश्चय ही यशाची ‘त्रिसूत्री”; रितू फोगाट

भारमातानगर दिघी ते भोसरी आळंदी रस्त्याची दुरवस्था झाली होती. रस्त्यात खड्डे पडले होते. पावसाळ्यात पाणी साचून राहत होते. परिणामी वाहनधारकांना त्यामधून मार्ग काढताना जिकिरीचे होत असे. रस्ता काँक्रीटीकरण करणे गरजेचे असल्याचे सातत्याने नागरिकांचे म्हणणे होते. त्यानुसार आमदार महेश लांडगे यांच्याकडे परिसरातील नागरिकांनी तक्रारींचे गार्‍हाणे मांडले. आमदार लांडगे यांनी आमदार निधीतून हे काम हाती घेतले आहे. भारतमातानगर दिघी ते भोसरी आळंदी रस्ता काँक्रीटीकरणाच्या कामाचे भुमिपूजन करण्यात आले आहे.

स्थानिक नागरिकांनी मानले आभार..

रस्ता तयार करण्यासाठी सहकार्य करणार्‍या पांडुरंग वाळके, विकास वाळके, प्रसन्न वाळके, काळुराम वाळके यांच्या व मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. या वेळी परिसरातील नागरिक उपस्थित होते. प्रलंबित रस्त्याच्या कामाला गती मिळाल्याने भारतमातानगर येथील नागरिकांच्या वतीने आमदार महेश लांडगे यांचे आभार मानण्यात आले आहेत.

दिघी जोडणाऱ्या पर्यायी रस्त्यांचा विकास करण्यासाठी आम्ही ‘व्हीजन-२०२०’ अंतर्गत पुढाकार घेतला होता. भोसरी-आळंदी रस्त्याला जोडणाऱ्या या रस्त्याची दुरवस्था झाली होती. त्यामुळे स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांना नाहक मन:स्ताप सहन करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम हाती घेतले आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात काम पूर्ण करुन रस्ता सेवेत दाखल होईल.

महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button