रहाटणीतील सार्वजनिक जागेचे टाकाऊ वस्तूंमधून सुशोभीकरण; महिला सक्षमीकरणाचा संदेश
महापालिकेच्या ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत अभिनव उपक्रम

पिंपरी | पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्रमांक २७ मधील रहाटणी–श्रीनगर परिसरात एक अभिनव उपक्रम राबविण्यात आला आहे. तमारा सोसायटी, नखाते चौक परिसरातील सार्वजनिक जागेचे टाकाऊ वस्तूंच्या कल्पक वापरातून आकर्षक सुशोभीकरण करण्यात आले आहे.
या उपक्रमात सफाई कर्मचाऱ्यांनी केवळ स्वच्छता न करता टाकाऊ टायर, पाइप्स, प्लास्टिक बॉटल्स, फायबर पुतळे तसेच RRR सेंटरमध्ये जमा होणाऱ्या साड्या व अलंकारिक वस्तूंचा वापर करून रस्त्याकडील जागा आणि सार्वजनिक ठिकाणे सुंदर केली. या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचा प्रभावी संदेशही देण्यात आला.
या सुशोभीकरण उपक्रमाचे उद्घाटन महानगरपालिकेचे अधिकारी, नगरसेवक, सोसायटी पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक तसेच स्थानिक नागरिक आणि दुकानदार यांच्या हस्ते करण्यात आले. हा उपक्रम उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यावेळी ‘ग’ क्षेत्रीय अधिकारी किशोर ननवरे, सहाय्यक आरोग्य अधिकारी अतुल सोनवणे, मुख्य आरोग्य निरीक्षक पृथ्वीराज कांबळे, शशिकांत मोरे, उमेश कांबळे, आरोग्य निरीक्षक गणेश राजगे तसेच आरोग्य विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डिवाईन वेस्ट मॅनेजमेंट अँड सर्व्हिसेस संस्था आणि शुभम उद्योग संस्थेने या उपक्रमात विशेष योगदान दिले.
हेही वाचा : महाराष्ट्रावर पुन्हा अस्मानी संकट! ३० मार्चपासून वादळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा
प्रभाग २७ मधील नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन, सागर कोकणे, नगरसेविका सविताताई खुळे व अर्चनाताई तापकीर यांनीही सहभाग नोंदविला. यावेळी तमारा सोसायटीचे चेअरमन संतोष जाधव, सेक्रेटरी डोंगरे व रानपिसे यांच्या हस्ते उपस्थितांचा सत्कार करण्यात आला. शहरात उघड्यावर टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळे अस्वच्छता व दुर्गंधी पसरते. यावर उपाय म्हणून अशा ठिकाणी सुशोभीकरण करून कचरा न टाकण्याचे आवाहन करण्यात येत असून नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.