breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

बदलापूर अत्याचार प्रकरण । पक्ष फोडण्यात मशगुल असलेल्या गृहमंत्र्यांमुळे महाराष्ट्रातील गुन्हेगार मोकाट!

'राज्यात वाढलेल्या गुन्हेगारीला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार'; सुलभा उबाळे

पिंपरी : महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे पक्ष फोडण्यात मश्गुल आहेत. त्यांना महाराष्ट्रात काय चाललंय याच्याशी काही देणे घेणे नाही. महाराष्ट्रात कायदा पायदळी तुडवला जात आहे. गुन्हेगारांवर वचक राहिला नाही. गुन्हेगार पोलिसांना जुमानत नाही तेथे सर्वसामान्य जनतेने काय व्यथा सांगायची. महाराष्ट्राची वाटचाल नक्की कोणत्या दिशेने चालली आहे असा प्रश्न आम्हा कार्यकर्त्यांना पडत आहे. महाराष्ट्रात राजरोसपणे सुरू असलेल्या अंदाधुंदी मनमानीला, गुन्हेगारीला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असून त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पुणे जिल्हा संघटिका सुलभा उबाळे यांनी केली.

बदलापूरमधील आदर्श शिक्षण संस्थेच्या शाळेत १३ ऑगस्ट रोजी दोन चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना घडल्या. बदलापुरातील शाळेत घडलेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना शहर महिला आघाडी व शहर शिवसेनेच्या वतीने बुधवारी आकुर्डी येथे घटनेचा निषेध नोंदवत तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनामाची मागणी करण्यात आली. महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी काळ्याफिती लावून गृहमंत्र्यांच्या कारभाराचा निषेध व्यक्त केला
आंदोलनाला जिल्हा संघटिका शैला खंडागळे, उपसंघटक वैशाली मराठी, शहर संघटिका अनिता तुतारे,  , उपशहर प्रमुख कामिनी मिश्रा, पिंपरी विधानसभा प्रमुख वैशाली कुलथे, माजी शहर संघटक सुशीला पवार, शहर संघटक संतोष सौन्दणकर, माजी नगरसेवक धनंजय आल्हाट, मीनल यादव, रवी लांडगे, उपजिल्हा संघटक दस्तगीर मणियार, उपशहर प्रमुख रजनी वाघ, योगिनी मोहन, उपविभाग संघटिका तसलीम शेख, वैशाली काटकर, विभाग संघटिका अश्विनी खंडेराव, कमल गोडांबे उपविभाग संघटिका कलावती नाटेकर ,विभाग प्रमुख नितीन बोंडे, सर्जेराव कचरे, संतोष म्हात्रे आदी उपस्थित होते.

हेही वाचा    –      बदलापूर अत्याचार प्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा करा; प्रा. कविता आल्हाट

यावेळी सुलभा उबाळे म्हणाल्या, सत्तेत असलेल्या भाजपला  जनतेच्या सुरक्षेबाबत काही देणे घेणे नाही.  गृहमंत्री फडणवीस त्यांच्याकडे  पक्ष फोडण्याची, सत्तेची खुर्ची वाचविण्याची जबाबदारी दिलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सुरू असलेल्या मनमानीवर गृहमंत्र्यांचा वचक नाही. पर्यायाने पोलीस यंत्रणा अक्षरश: कोलमडलेल्या स्थितीत आहे.  चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना घडल्यानंतर पीडित पालकांची तक्रार नोंदवून घेतली जात नाही.  11 तासाहून अधिक वेळ पालकांना पोलीस ठाण्यात बसवून ठेवले जाते.  अशा प्रकारची दिरंगाई याआधी महाराष्ट्रात कधीही पाहायला मिळालेली नाही. . रस्त्यावर माणसे  चिरडली जातात मात्र पोलीस यंत्रणा आरोपीला वाचवण्यात आपला वेळ खर्ची करते.  यावर गृहमंत्री तात्काळ कारवाई करत नाहीत. त्यामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्था अक्षरशः पायदळी तुडवली जात आहे असेच दिसून येत आहे.

‘फास्टट्रॅक’ वर सुनावणी घ्या….

शासनाच्या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आम्हाला देण्यात येणार असलेले १५०० रुपये नको. मात्र, आम्हाला सुरक्षितता द्या अशी मागणी करत शिवसेना महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी करत त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आरोपीवर तात्काळ कारवाई करा.  फास्टट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून आरोपी विरोधात खटला चालवून चिमुरड्या मुलींना न्याय मिळवून द्या अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button