TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चऱ्होली परिसरातील महिलांसाठी अष्टविनायक दर्शन यात्रा; सुमारे ३ हजार महिलांना लाभ

  • भाजपा स्वीकृत नगरसदस्या साधना तापकीर, कोषाध्यक्ष सचिन तापकीर यांचा स्तुत्य उपक्रम
  •  परिसरातील महिला भाविकांकडून उपक्रमाचे कौतूक; अचूक नियोजनाला दिली दाद

पिंपरी । प्रतिनिधी
चऱ्होली आणि परिसरातील महिलांना अष्टविनायक यात्रा करता यावी. तसेच, महिलांना मोकळेपणाने संवाद साधता यावा. याकरिता भाजपा स्वीकृत नगरसदस्या साधना तापकीर आणि कोषाध्यक्ष सचिन तापकीर यांच्या पुढाकाराने अष्टविनायक दर्शन यात्रा मोफत आयोजित करण्यात आली. विशेष म्हणजे, दोन टप्प्यांत आयोजित केलेल्या या यात्रेत सुमारे ३ हजार महिलांनी सहभाग घेतला.
भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन व साधना तापकीर यांनी परिसरातील महिलांसाठी अष्टविनायक मोफत दर्शन यात्रेचे नियोजन केले होते. त्यामध्ये मोरगावचा मोरेश्वर, सिद्धटेकचा सिद्धीविनायक, थेउरचा चिंतामणी, रांजणगावचा महागणपती, ओझरचा विघ्नेश्वर, लेण्याद्रीचा गिरिजात्मक, पालीचा बल्लाळेश्वर आणि महडचा वरदविनायक असे देवदर्शन करण्यात आले. परिसरातील महिलांनी उत्स्फूर्तपणे यात्रेत सहभाग घेतला.
दि.१५ फेब्रुवारी २०२२ रोजी पहिली यात्रा काढण्यात आली. एकूण २० बसेसेच्या माध्यमातून महिलांना अष्टविनायक दर्शन घडवण्यात आले. त्यानंतर दि. २१ फेब्रुवारी असे यात्रेचे नियोजन करण्यात आले. दोन दिवसांच्या कालावधीची एक यात्रा असल्यामुळे महिलांच्या राहणे, खाणे यासह चहा-नाष्टयाची चांगली सुविधा करण्यात आली. महिलांना मोकळेपणाने सर्वांशी संवाद करता यावा, असे नियोजन केल्यामुळे यात्रेकरुन महिलांनी समाधान व्यक्त केले.
यात्रेत सहभागी होणाऱ्या महिलांना कोविडचे दोन डोस पूर्ण असल्याचे प्रमाणपत्र, मतदान कार्ड, आधार कार्ड, दैनंदिन गरजेच्या वस्तू सोबत घ्याव्यात, असे आवाहन केले होते. यात्रा यशस्वी करण्यासाठी माजी महापौर तथा नगरसेवक नितीन काळजे, नगरसेविका सुवर्णा बुर्डे, अजित बुर्डे यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे योगदान लाभले.


नागरिकांनी अविरत सेवा करण्याची संधी द्यावी : साधना तापकीर
स्वीकृत नगरसदस्या साधना तापकीर म्हणाल्या की, प्रथमतः मी सर्वांचे शतशःआभार व्यक्त करते की, आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली व सचिन तापकीर यांच्या सौजन्याने अष्टविनायक यात्रा पार पडली. त्यात परिसरातील महिलांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. हजारोंच्या संख्येने चऱ्होली परिसरातील माता-भगिणी यात्रेत सहभागी होऊन अष्टविनायक यात्रा अविस्मरणीय केली. अशीच अविरत सेवा करण्याची संधी नागरिकांनी द्यावी, असे आवाहनही साधना तापकीर यांनी केले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button