ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कृष्ण प्रकाश यांची बदली होताच पिंपरीत चोरट्यांनी घडवला स्फोट

पिंपरी चिंचवड | जातील तिथे आपल्या सिंघम स्टाइलने वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या कृष्ण प्रकाश यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये देखील त्यांनी दरारा निर्माण केला होती. वेषांतर करून आरोपींच्या मुसक्या आवळनं असो किंवा दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या गुंडांना सप्राइज देणं असो, अशा अनेक धडक कारवाया पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त असताना कृष्ण प्रकाश यांनी केल्या. शहरातील गुन्हेगारांमध्ये पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांचा चांगलाच धाक बसायला लागला होता मात्र अचानक त्यांची बदली झाली आणि विशेष पोलिस महानिरीक्षक (व्ही.आय.पी. सुरक्षा) महाराष्ट्र राज्य, मुंबई येथे त्यांची वर्णी लागली. मात्र कृष्ण प्रकाश यांची बदली होताच पिंपरी-चिंचवडमध्ये चोरट्यांनी स्फोट केला. शहरात गुन्हेगारी पुन्हा डोकेवर काढेल, अशी चर्चा सुरू आहे.

झपाट्याने विकास करत असलेलं पिंपरी चिंचवड शहर हे कष्टकऱ्यांचे शहर मानले जाते. पुण्यात नोकरी असणारे सुद्धा काही नोकरदार पिंपरी चिंचवड शहर पुण्याच्या तुलनेत काही स्वस्त असल्याने पिंपरीत राहण्यास पसंती देतात. शहरात आयटी क्षेत्रामुळे मोठ्या प्रमाणावर कामगारांची मागणी असते. तसेच एमआयडीसीमुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून मजूर पिंपरीत कामासाठी येत असतात. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील गर्दी दिवसेंदिवस वाढतच आहे. वाढत्या गर्दी बरोबर गुन्ह्यांची संख्या देखील वाढत आहे, असं चित्र सध्या पिंपरी-चिंचवड शहरात आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची बदली झाली आणि काही तासांतच शहरात स्फोटाच्या धमाक्याने नागरिकांची झोप उडवली.

अंकुश शिंदे हे पिंपरी चिंचवडवडच्या आयुक्तपदी पदभार स्वीकारणार आहेत. मात्र, नवीन आयुक्तांनी पदभार स्वीकारण्याआधीच चोरट्यांनी आज पहाटे एक धमाका केला आहे. आज पहाटे तळवडेतील त्रिवेणीनगर भागातील नागरिकांना जोरदार धमक्याचा आवाज ऐकू आला. काही चोरट्यांनी या भागातील कॅनरा बँकेचे एटीएम फोडण्यासाठी चक्क जिलेटीन बॉम्बचा वापर केला आहे. या स्फोटाने एटीएमचे मोठे नुकसान झाले. पण सर्व रोकड सुरक्षित आहे. स्फोटाचा आवाज ऐकल्यावर नागरीक जागे झाले. त्यामुळे चोरट्यांचा पैसे लंपास करण्याचा डाव फसला. चोरट्यांचा एटीएम लुटण्याचा टायमिंग बघता कृष्ण प्रकाश यांची बदली होताच पिंपरीत गुन्हेगार पुन्हा सक्रिय झाले, अशा चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button