कोविड काळात मानवतेचे कार्य म्हणून; आता सुरेशतात्या म्हेत्रे!
मिशन – PCMC: प्रभाग क्रमांक 1 चिखली- म्हेत्रेवस्तीमधील नागरिकांची भावना

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
कोविडच्या कठीण काळात प्रभाग क्रमांक 1, चिखलीमधील नागरिकांसाठी माजी नगरसेवक सुरेश (तात्या) म्हेत्रे यांनी मानवतेचे अप्रतिम उदाहरण सादर केले. एका स्थानिक महिलेच्या पतीला संसर्ग झाल्यावर हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर उपलब्ध करून देणे, औषधांची सोय करणे आणि मानसिक तसेच आर्थिक आधार देणे – अशा संकटाच्या क्षणी तात्या म्हेत्रे यांनी धीर दाखवला. दुर्दैवाने त्या महिलेच्या पतीचे निधन झाले, तरी नंतरच्या आर्थिक आणि व्यावसायिक त्रासात तात्या म्हेत्रे यांनी पाठिंबा दिला. या कृतीमुळे स्थानिक नागरिक त्यांना वडिलासमान आदर देत आहेत.
भाजपा नेते व आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्त्वाखाली, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक प्रभाग क्रमांक 1 चिखलीत माजी नगरसेवक सुरेश म्हेत्रे आता निवडणुकीच्या रिंगणात आहेत. नागरिकांचे मत स्पष्ट आहे की, प्रभागातील प्रगतीसाठी आणि जनतेच्या हितासाठी सुरेशतात्या म्हेत्रे हे एकमेव व्यक्तिमत्व आहेत जे सतत लोकांसाठी काम करीत आहेत.
हेही वाचा – भारतात खेळा अन्यथा…, आयसीसीने बांगलादेशची मागणी फेटाळली

निवडणूक मार्गदर्शनानुसार, प्रभाग क्रमांक 1 मधील पहिल्या ईव्हीएम मशीनवरील अनुक्रमांक 2 वरील सुरेश (तात्या) रंगनाथ म्हेत्रे यांच्या नावासमोरील कमळ निशाणीवरील बटण दाबून त्यांना विजयी करावे, असे नागरिक सांगत आहेत. कोविड काळातील या मानवतेच्या कृतीमुळे आणि जनतेच्या हितासाठी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे, सुरेशतात्या म्हेत्रे यांच्या नेतृत्वाखाली चिखलीतील प्रगती, सेवा आणि नागरिकांशी घट्ट नाते कायम राहण्याची अपेक्षा सर्वांमध्ये दृढ आहे.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
“कोविड काळात ज्या क्षणी जनतेला मदतीची गरज भासली, त्या प्रत्येक क्षणी मी माझ्या लोकांसोबत उभा राहण्याचा प्रयत्न केला. प्रभागातील प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी माझे ध्येय नेहमीच सर्वोच्च राहील.”
– सुरेश तात्या म्हेत्रे, उमेदवार, भाजपा, प्रभाग- 1, चिखली-म्हेत्रेवस्ती.




