TOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपपिंपरी / चिंचवड

हिंजवडीमध्ये क्रिकेट खेळताना वाद, तरुणावर प्राणघातक हल्ला

पिंपरी: पिंपरी-चिंचवडमधील हिंजवडी परिसरात क्रिकेट खेळण्यावरून झालेल्या किरकोळ वादातून दोन तरुणांनी एका तरुणावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. यात हल्ला झालेला तरुण गंभीर जखमी झाला आहे. हर्षल प्रवीण अहिरे (वय २०) असे जखमी तरुणाचे नाव असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी येथील एका मैदानावर हर्षल मित्रांसोबत क्रिकेट खेळण्यासाठी गेला होता. खेळता खेळता हर्षलसोबत इतर मित्रांचे भांडण झाले. मात्र, भांडणाचे पुढे मारहाणीत रुपांतर झाले. यावेळी दोघांनी त्याला क्रिकेटच्या बॅटने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली.

यात तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी मारहाण करणाऱ्या नीरजसिंग सिकरवार आणि अभिनव या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button