ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिका पशुवैद्यकीय विभागासाठी अधिकाऱ्यांची मानधनावर नियुक्ती

पिंपरी चिंचवड | पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागासाठी पशुवैद्यकीय अधिकारी, पशुवैद्यक, क्युरेटर आणि पशुशल्यचिकित्सक या पदांची भरती करण्यात येणार आहे. सहा महिन्यांसाठी मानधन तत्त्वावर या पदांची भरती करण्यात येणार आहे. या पदांवर भरती करण्यास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

महापालिकेच्या वतीने निसर्गकवी बहिणाबाई चौधरी सर्पोद्यान या ठिकाणी 1 पशुवैद्यक आणि एक क्युरेटर या पदावर नियुक्ती करण्यात येणार आहे. तसेच, नेहरूनगर येथील प्राणी सुषुश्रा केंद्रामध्ये एक पशुवैद्यकीय अधिकारी आणि एक पशुशल्यचिकित्सक या पदावर भरती करण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यास प्रतिसाद दिलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यामधून निवड समितीने निवड केली आहे.

पशुवैद्यकीय अधिकारी या पदासाठी डॉ. अमित भारद्वाज यांची दरमहा 45 हजार रुपये वेतनावर नियुक्ती केली आहे. तर, पशुवैद्यक या पदावर डॉ. रुचिता सांगळे, क्युरेटर या पदावर डॉ. घनश्याम पवार यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांना 45 हजार रुपये वेतन दिले जाणार आहे. तर, पशुशल्यचिकित्सक या पदावर डॉ. पुष्पनाथ चौगुले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना दरमहा 50 हजार रुपये वेतन दिले जाणार आहे. यांची सहा महिने कालावधीसाठी नियुक्ती करण्यास स्थायी समितीने आयत्यावेळी मान्यता दिली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button