breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिकेच्या 118 शाळांमध्ये 23 समुपदेशकांची नियुक्ती

पिंपरी :  पिंपरी-चिंचवड महापालिकेने या शैक्षणिक वर्षापासून 118 शाळांमधील 30 हजारहून अधिक विद्यार्थ्यांसाठी प्रथमच कंत्राटी पद्धतीने 23 समुपदेशकांची नियुक्ती केली आहे. नियुक्त समुपदेशक वैयक्तिक, संपुर्ण वर्ग आणि शाळा (शिक्षक, पालक आणि समुदायासह) या तीन स्तरांवर काम करणार आहेत.

विद्यार्थ्यांच्या सामाजिक, भावनिक, शारीरिक आणि विकासात्मक गरजा समजून घेणे तसेच त्यांचा सकारात्मक दृष्टिकोण वाढविणे हे समुपदेशकांचे उद्दिष्ट असणार आहे. शालेय कर्मचारी, पालक आणि समुदाय यांच्यामध्ये योग्य समन्वय साधण्यासाठी तसेच मुलांचे सर्वांगीण कल्याणाचे हित जपण्यासाठी समुपदेशकांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. शिक्षण विभागाचे हे महत्वाकांक्षी पाऊल नवीन शैक्षणिक धोरण – 2020 अंतर्गत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर तसेच सामाजिक आणि भावनिक कल्याणाचे महत्व अधोरेखित करते.

हेही वाचा     –      विराट कोहली-गौतम गंभीरबद्दल आशिष नेहराचं मोठं वक्तव्य; म्हणाला.. 

महापालिकेचा हा अभिनव उपक्रम सार्वजनिक शिक्षणासाठी एक नवीन मानक प्रस्थापित करत आहे. विद्यार्थ्यांच्या सामाजिक आणि भावनिक विकासावर भर देण्यासाठी महापालिका शाळांमध्ये प्रथमच समुपदेशन उपक्रम राबविण्यात येत आहे. महापालिकेचा हा अभिनव उपक्रम सार्वजनिक शिक्षणासाठी नवीन मानक प्रस्थापित करत असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये मानसिक आरोग्याच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर लक्ष केंद्रित करत आहे. यामध्ये शालेय कर्मचारी आणि पालक यांचा सहभागही महत्वाचा आहे.

– शेखर सिंह,आयुक्त,पिंपरी चिंचवड महानगरपालिका

समुपदेशनासाठी पात्र उमेदवारांची निवड करण्यासाठी विशिष्ट प्रक्रिया राबविण्यात आली होती. या प्रक्रियेमध्ये अर्जदारांचे त्यांच्या विषयातील ज्ञानाचे मूल्यांकन करण्यासाठी लेखी अभियोग्यता चाचणी तसेच मुलाखत घेण्यात आली होती. तर आवश्यक शैक्षणिक पात्रतेमध्ये मानसशास्त्रात पदवी आणि पदव्युत्तर किंवा समाजकार्यातील पदव्युत्तर शिक्षण तसेच विद्यार्थ्यांसमवेत काम करण्याचा किमान एक वर्षाचा अनुभव अशी अट उमेदवारांसाठी ठेवण्यात आली होती. महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गरजा प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी नियुक्त समुपदेशक सज्ज झाले असून निवड करण्यात आलेले समुपदेशक पात्र असल्याची खात्री करण्यासाठी विशिष्ट प्रक्रिया राबविण्यात आली होती. यामध्ये उमेदवारांच्या ज्ञानाचे परिक्षण करण्यात आले. तसेच तज्ञांद्वारे या समुपदेशकांना आठवडाभराचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

– प्रदीप जांभळे पाटील,अतिरिक्त आयुक्त,पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

विद्यार्थ्यांची शैक्षणिक, सामाजिक आणि भावनिकदृष्ट्या भरभराट होण्यास मदत मिळणार आहे. महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण कल्याणासाठी महापालिका कटिबद्ध असून प्रथमच सार्वजनिक शाळांमध्ये समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. समुपदेशनाच्या आधारे विद्यार्थ्यांची शैक्षणिक, सामाजिक आणि भावनिकदृष्ट्या भरभराट होण्यास मदत मिळणार आहे.

– विजयकुमार थोरात,सहाय्यक आयुक्त,शिक्षण विभाग

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button