breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

अजित पवारांना बालेकिल्ल्यात आणखी एक हादरा; शहराध्यक्षानंतर कट्टर समर्थक शरद पवार गटात जाण्याच्या तयारीत?

पिंपरी :  पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. पिंपरी चिंचवड हा अजित पवारांचा बालेकिल्ला मानला जातो.  सुरुवातीपासून  अजित पवारांचा  बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवडमधून अजितदादांना हादरे बसायला सुरुवात झाली आहे. पिंपरी चिंचवडचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणेनंतर आता अजित पवारांचे  कट्टर समर्थक नाना काटे  हे  शरद पवार गटात जाणार असल्यच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे लोकसभा निकालानंतर  अस्वस्थ असलेल्या अजित पवार गटात मोठी खळबळ उडाली आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण गेल्या वर्षी चिंचवडची पोटनिवडणूक लढलेले अजित पवारांचे कट्टर समर्थक नाना काटे काहीही झालं तरी, मी चिन्हावरचं लढणार,  यावर ते ठाम आहेत. अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणेंनी माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांसह शरद पवारांची भेट घेतली. त्यावेळी शरद पवारांनी सर्वांसाठी दारं खुली ठेवल्याचं जाहीर केलं. आता याच दारातून नाना काटे ही घरवापसी करण्याची शक्यता नाकारता येत नाही. शरद पवारांनी ऑफर दिल्यास, तुम्ही तुतारी चिन्हावर लढणार का? या प्रश्नावर मी चिन्हावरचं निवडणूक लढणार असं म्हणत त्यांनी संभ्रमावस्था वाढवली.

हेही वाचा –  उद्योगनगरीत वाढतेय घुसखोरी; बनावट आधार कार्ड सापडले

नाना काटे म्हणाले, आगामी विधानसभा निवडणूक मी लढवणार आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघात आमची ताकद आहे. जरी महायुतीचे तिकीट भाजपला गेले तरी मी ही निवडणूक लढवणार आहे.मी विधानसभेच्या अनुषंगाने अजितदादांची भेट घेतली होती. विधानसभेत आम्ही तयारीला लागलो आहे. अजित पवारांनी मला तू तुझ्या पद्धतीने काम सुरू ठेव असे म्हणत संकेत दिले आहेत. जे काही असेल ते पुढे पाहू, असे दादा म्हणाले. कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवायची हे त्या त्यावेळी निर्णय घेतले जातील. निवडणुकीला मी सामोरे जाणार आहे. चिन्ह काय असेल ते त्यावेळची परिस्थिती जशी असेल तसे मी ठरवणार आहे.

शरद पवार गटात प्रवेश पवार करणार का? असे विचारले असता नाना काटे यांनी स्मितहास्य करत त्यावेळेस सांगू असे म्हणत संभ्रमावस्था वाढवली. शरद पवारांनी जर तिकिट दिले तर निवडणूक लढवणार का? या प्रश्नावर उत्तर देताना नाना काटे म्हणाले, सध्या कोणताही निर्णय घेतलेला नाही. हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला जाईल याविषयी कोणतीही निश्चितता नाही. कारण भाजपमध्ये इच्छुक उमेदवार जास्त आहेत. जगताप यांच्याकडे देखील दोन उमेदवार आहेत. त्यामुळे या वादामुळे ही जागा राष्ट्रवादीला सुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे लगेच वक्तव्य करणे योग्य निर्णय ठरणार नाही.

महायुतीमध्ये ज्या पक्षाचा आमदार आहे त्या पक्षाला ती जागा सोडायची, सध्या चिंचवडमध्ये सध्या दिवंगत भाजप नेते लक्ष्मण जगतप यांच्या पत्नी  आश्विनी जगताप या आमदार आहेत. काही दिवसांपूर्वीच मी लक्ष्मण जगताप यांची खरी वारसदार म्हणत त्यांनी आगामी निवडणुका लढवण्यास इच्ठुक असल्याचे सांगितले. दुसरीकडे लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांनी सुद्धा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे सांगितले आहे. नाना काटे यांनी विधानसभा पोटनिवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button