breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आठ महिन्यांच्या वेदिकाला १६ कोटींच्या लसीची गरज

  • १६ कोटींच्या लसीसाठी आर्थिक मदतीचे आवाहन
  • दोन महिन्यांमध्ये उभे करावे लागणार १६ कोटी
  • चिमुकलीचे प्राण वाचवण्याचे समाजापुढे आव्हान

पुणे-पिंपरी-चिंचवड / महाईन्यूज

कु. वेदिका शिंदे ही पुण्यामधील भोसरी येथील रहिवासी सौरभ शिंदे व स्नेहा शिंदे यांची एकुलती एक मुलगी आहे. तिला एसएमए प्रकार – १ (SMA (spinal muscular atrophy) type -1) हा दुर्मिळ आजार झाला आहे. हा आजार खूप जलद गतीने बाळाच्या नसा आणि स्नायूंना कमकुवत करतो. जसजसे हे प्रमाण वाढत जाते तसतसे रुग्णाला श्वास घेणे, चालणे, शरीराची हालचाल करणे, मान धरणे या सगळ्या क्रिया करताना त्रास व्हायला सुरुवात होतो. वेळेवर उपचार मिळाले नाहीत, तर शरीरातील सगळे भाग निकामी होऊन रुग्ण दगावतो.

वेदिका आत्ता ८ महिन्यांची आहे आणि तिला या समस्या सुरू झाल्या आहेत. वेदिका वरती पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे वेदिकाला पुढील दोन महिन्यांमध्ये लस देण्याची आवश्यकता आहे. दोन महिन्यांच्या आत लस दिली तर वेदिका पूर्णपणे ठणठणीत बरी होऊ शकते. लसीचे नाव – झोलगेन्स्मा (Zolgensma) असे आहे. ही लस अमेरिकेमधून आयात करावी लागणार आहे, या लसीची किंमत सुमारे १६ कोटी रुपये आहे.

इतक्या मोठ्या प्रमाणात खर्च करण्यासाठी वेदिकाच्या पालकांची आर्थिक परिस्थिती बरी नाही. ही लस मागवण्यासाठी त्यांना आर्थिक मदतीची अपेक्षा आहे. तरी, भारतामधील दानशूर व्यक्तींनी वेदिकासाठी पुढे येऊन सढळ हाताने मदत करावी, अशी अपेक्षा तिच्या वडिलांना आहे.

मदतीसाठी येथे करा संपर्क

https://milaap.org/fundraisers/support-vedika-shinde

या वेबसाईट द्वारे आपण वेदिकाला मदत करू शकतो तसेच बारकोडद्वारे सुद्धा मदत करू शकतो.

गूगल पे – फोन पे नंबर – 9922098885

आपल्या सर्वांच्या मदतीमुळे आपण या चिमुकलीला जीवदान देऊ शकतो. या लसीच्या मदतीने वेदिका पूर्णपणे ठणठणीत बरी होऊन तिचा पहिला वाढदिवस साजरा करू शकते. वेदिकाच्या पालकांची तळमळ बघता समाजातील तळागाळातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. आपण ही समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून आपापल्या परीने शक्य तेवढी मदत करावी, अशी भावना व्यक्त होत आहे.

महाराष्ट्राची कन्या वेदिका हिला वाचवण्यासाठी समाजाच्या तळागाळातील नागरिकांनी पुढे येण्याचे आव्हान आज महाराष्ट्राच्या समोर आहे. आणि महाराष्ट्रातील जनता हे आव्हान स्वीकारून वेदिकाला या आजारातून बाहेर काढेल असा ठाम विश्वास वेदिकाच्या आई वडिलांनी व्यक्त केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button