मोशीतील प्रियदर्शनी स्कूलचा राष्ट्रीय स्तरावरील भारत प्रतिभा सन्मान
शिक्षण विश्व : राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन करत शिक्षण क्षेत्रात वेगळा ठसा

पिंपरी चिंचवड : प्रियदर्शनी स्कूल, मोशी यांनी राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन करत शिक्षण क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. एनडीएमसी, नवी दिल्ली येथे आयोजित भव्य समारंभात शाळेला “भारत प्रतिभा सन्मान २०२६” या प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले.
हा सन्मान शाळेने शैक्षणिक गुणवत्ता, सर्वांगीण विकास आणि मूल्याधिष्ठित शिक्षणासाठी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची दखल म्हणून प्रदान करण्यात आला आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच चारित्र्यनिर्माण व राष्ट्रनिर्माणाची जबाबदारी जपणारी शाळा म्हणून प्रियदर्शनी स्कूल, मोशी यांची राष्ट्रीय स्तरावर ओळख अधिक दृढ झाली आहे.
हेही वाचा – ‘निवडणूक शांततेत व सुरळित पार पाडण्यासाठी समन्वयाने काम करा’; पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे
या यशामागे शाळेचे व्यवस्थापन, शिक्षकवृंद, विद्यार्थी तसेच पालकांचे सहकार्य व समर्पण मोलाचे ठरले आहे. राष्ट्रीय स्तरावरील या गौरवामुळे जबाबदार, आत्मविश्वासी आणि सक्षम भावी नागरिक घडवण्याच्या शाळेच्या ध्येयाला नवी ऊर्जा मिळाली आहे.
प्रियदर्शनी स्कूल, मोशी ही संस्था भविष्यातही उच्च शैक्षणिक मानदंड, मूल्याधिष्ठित शिक्षण आणि सर्वांगीण विकास यांचा समतोल साधत समाजासाठी आदर्श घडविण्यास कटिबद्ध असल्याचे यावेळी सांगण्यात आले.




