व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केल्याने मुलाने बापाचा दात पाडला
![After being admitted to a de-addiction center, the boy lost his father's teeth](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/Assault-1573201490.jpg)
पिंपरी चिंचवड | व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केल्याचा राग आल्याने ठोसा मारून मुलानेच बापाचा दात पाडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तसेच, आईला देखील मारहाण करून भाडेकरूंना पैशाची मागणी करत दुकाने जाळून देण्याची धमकी दिली. 16 ऑक्टोंबर ते 10 डिसेंबर या कालावधीत इंद्रायणीनगर, भोसरी येथे हा प्रकार घडला. याप्रकरणी 35 वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे.पराग पुरूषोत्तम चौकडे (वय 35, रा. लांडगे वस्ती, भोसरी) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी त्याचे वडील पुरूषोत्तम सिताराम चौकडे (वय 65, रा. इंद्रायणी कॉलनी, भोसरी) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि.10) फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पुरूषोत्तम यांनी आपला मुलगा आरोपी पराग याला व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केले. परागला याचा राग आल्याने त्याने आपल्या वडिलांच्या गालावर जोराचा ठोसा मारून त्यांचा दात पाडला तसेच, आईने मध्यस्ती केली असता तिला देखील मारहाण केली. परागने फिर्यादी यांचे भाडेकरूंकडे पौशाची मागणी केली व दुकाने जाळण्याची धमकी दिली. असे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी एमआयडीसी पोलीस अधिक तपास करीत आहेत.